मुंबई - सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविरोधात माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंद अडसूळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने आनंद अडसुळांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. उच्च न्यायालयाने आनंद अडसुळांना याचिकेत सुधारणा करण्याची मुभा देत सुनावणी ८ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली आहे. यामुळे आता आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आनंदराव अडसूळ अडचणीत -
सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत यांना चौकशीचे समन्स बजावले आहे. तसेच त्यांच्या कांदिवली येथील घर आणि कार्यालयातही ईडीने तपास केला होता. ईडीचे अधिकारी आनंद अडसूळ यांच्या घरी गेले होते. त्यांची चौकशी सुरु असताना अडसूळ यांची अचानक तब्येत बिघडली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र, शिवसेना नेते आनंद अडसूळ यांनी ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करत अटकेपासून दिलासा देण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यालयात धाव घेतली होती. काल (गुरूवार) न्यायालयात अडसूळ यांच्या विनंती याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान आनंद अडसूळ यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना काहीही झालेले नाही असा दावा ईडीने न्यायालयात केला होता. विशेष म्हणजे न्यायालयाने दोन्ही वादी-प्रतिवाद्यांचे म्हणणे ऐकूण घेतले असून यावर आज (शुक्रवार) सुनावणी पारपडली आहे. मात्र, न्यायालयाने अडसुळांना कोणताही दिलासा देण्यात नकार दिला आहे. उच्च न्यायालयाने आनंद अडसुळांना याचिकेत सुधारणा करण्याची मुभा देत सुनावणी ८ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे अडसूळ हे सध्या अडचणीत सापडले आहे.