महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sc on malegaon blast case मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला कधी पूर्ण होणार? उच्च न्यायालयाचा एनआयएला सवाल - NIA

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट (2008 malegaon blast case) प्रकरणाच्या संदर्भात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला कधी पूर्ण होणार? (investigation of Malegaon blast case )असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने (high court) एनआयएला (NIA) केलाय. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपी समीर कुलकर्णी (Sameer Kulkarni) यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने एनआयएला हा सवाल केला.

Sc on malegaon blast case
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास कधी पूर्ण होणार? उच्च न्यायालयाचा एनआयएला सवाल

By

Published : Sep 24, 2022, 6:55 PM IST

मुंबई2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट (2008 malegaon blast case) प्रकरणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट तसेच उच्च न्यायालयाने निर्देश देवुनही खटला लांबत चालला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला कधी पूर्ण होणार? (investigation of Malegaon blast case )असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने (high court) एनआयएला (NIA) केलाय. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपी समीर कुलकर्णी (Sameer Kulkarni) यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने एनआयएला हा सवाल केला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर कुलकर्णी याच्या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेवरील पुढील सुनावणी 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.

खटला कधी पूर्ण होणार? खंडपीठाने म्हटले की, या गतीने खटला पूर्ण करण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील? असा प्रश्न न्यायालयाने एनआयएला केला. त्यावेळी खटला जलदगतीने चालवण्याच्या न्यायालयाच्या मागील आदेशांचे पालन करण्यासाठी प्रत्येक सुनावणीच्या वेळी किमान दोन साक्षीदारांना हजर करण्यात येत असल्याचे एनआयएचे वकील संदेश पाटील (sandesh patil NIA) यांनी न्यायालयाला सांगितले. तथापि बऱ्याचदा एकाच साक्षीदाराची साक्ष अनेक दिवस नोंदवण्याचे काम सुरू असते. खटल्यातील एका साक्षीदाराची सलग 9 दिवस तपासणी केली गेली. अनेक दिवस सुरू असलेली उलटतपासणी न्यायालय किंवा आम्ही थांबवू शकत नाही असेही पाटील यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.

खटला चालवणाऱ्या विशेष न्यायालयाला खटला जलदगतीने निकाली काढण्यासाठी तपास यंत्रणा सहकार्य करू शकते. या प्रकरणी 495 साक्षीदारांना आरोपींविरोधात तपासण्यात येणार असल्याचे सुरुवातीला एनआयएने म्हटले होते. जुलै महिन्यात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 256 साक्षीदार तपासले असून आणखी 218 साक्षीदार तपासायचे असल्याचे तपास यंत्रणेने नमूद केले होते. परंतु गेल्या जुलै महिन्यापासून आतापर्यंत केवळ 15 साक्षीदार तपासण्यात आल्यावर न्यायालयाने बोट ठेवले. त्यावर जुलै महिन्यातील प्रतिज्ञापत्रात आणखी 218 साक्षीदार तपासण्याचे नमूद करण्यात आले असले तरी एवढे साक्षीदार तपासले जाणार नसल्याचा दावा एनआयएतर्फे करण्यात आला.

त्यानंतर आतापर्यंत खटल्यात 271 साक्षीदार तपासण्यात आले असून त्यापैकी 26 साक्षीदारांनी साक्ष फिरवली आहे. हा एक गंभीर खटला आहे आणि 14 वर्षे उलटली तरी खटला कोणत्याही निष्कर्षाप्रत आलेला नाही. याउलट निम्म्या आरोपींची सुटका झाल्याचे कुलकर्णी याने न्यायालयाला सांगितले. मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटला, समझौता बॉम्बस्फोट खटला, अजमेर बॉम्बस्फोट खटला कधीच निकाली निघाले. परंतु हा खटला अद्यापही निकाली निघालेला नसल्याचे कुलकर्णी याने न्यायालयाला सांगितले. कुलकर्णी याच्या आरोपांना पाटील यांनी आक्षेप घेतला.

न्यायालयानेही कुलकर्णी याला युक्तिवाद करताना नियमांचे पालन करण्यास सांगितले. आरोपी अर्ज दाखल करत राहतात आणि खटल्याच्या सुनावणीला विलंब करतात. असेही न्यायालयाने सुनावले. तसेच आरोपींकडून असे किती अर्ज करण्यात आले अशी विचारणा न्यायालयाने यावेळी केली. त्यावर 7190 अर्ज केल्याची माहिती पाटील यांनी दिली. तसेच याचिकेवरील सुनावणी स्थगित करताना खटला पूर्ण करण्यासाठी आणखी किती वेळ लागेल अशी विचारणा न्यायालयाने पुन्हा एकदा एनआयएकडे केली.

ABOUT THE AUTHOR

...view details