महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लोकलमधून पडलेल्या प्रवाशाला 4 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे मध्य रेल्वेला आदेश - Central Railway

मुंबईच्या लाईफ लाईन असलेल्या लोकल मध्ये रोज लाखो प्रवासी प्रवास करतात त्याचप्रमाणे याचिकाकर्ते हरीश दामोदर मुलुंड ते सीएसएमटी असा प्रवास करताना दादरजवळ लोकलमधून पडून जखमी झाले होते. लोकलमधून पडल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली नुकसानभरपाई मिळण्यासाठी रेल्वे विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) मध्य रेल्वेला ( Central Railway ) 4 लाख रुपये नुकसानभरपाई 31 जुलैपर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत.

उच्च न्यायालय
उच्च न्यायालय

By

Published : May 26, 2022, 10:49 PM IST

मुंबई -मुंबईच्या लाईफ लाईन असलेल्या लोकल मध्ये रोज लाखो प्रवासी प्रवास करतात त्याचप्रमाणे याचिकाकर्ते हरीश दामोदर मुलुंड ते सीएसएमटी असा प्रवास करताना दादरजवळ लोकलमधून पडून जखमी झाले होते. लोकलमधून पडल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली नुकसानभरपाई मिळण्यासाठी रेल्वे विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) मध्य रेल्वेला ( Central Railway ) 4 लाख रुपये नुकसानभरपाई 31 जुलैपर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत.

लोकलमधून प्रवास करताना पडून जखमी झालेल्या 55 वर्षीय प्रवाशाला 4 लाखांची नुकसानभरपाई द्यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे अपघात लवादाला दिले आहेत. 2004 साली चालत्या लोकलमधून पडलेल्या प्रवाशाकडे रेल्वेचा पास होता परंतु आयकार्ड नसल्याने तो अवैध ठरत असल्याचे सांगत लवादाने नुकसानभरपाई देण्यास नकार दिला होता. परंतु प्रवाशाने रेल्वे पाससोबत ओळखपत्र बाळगले नाही हे नुकसानभरपाई नाकारण्याचे कारण होऊ शकत नसल्याचे स्पष्ट करत न्या. एस.के. शिंदे यांनी रेल्वे अपघात लवादाला तातडीने नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

याचिकाकर्ते हरीश दामोदर यांनी त्यांना चार लाखांची नुकसानभरपाई नाकारणाऱया रेल्वे अपघात लवादाच्या निर्णयाला 2009 रोजी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हरीश हे मुलुंड ते सीएसएमटी असा प्रवास करताना दादरजवळ लोकलमधून पडून जखमी झाले होते. त्यांना बऱयाच जखमा होऊन त्यांना अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

हरीश दामोदर यांनी नियमानुसार चार लाखांची नुकसानभरपाई देण्याची मागणी लवादाकडे केली होती. मात्र त्यांच्याकडे प्रवासावेळी पास जरी असला तरी ओळखपत्र नसल्याने तो अधिकृत ठरत नसल्याचे कारण देत लवादाने त्यांचा अर्ज फेटाळला. हा अर्ज फेटाळताना लवादाने रेल्वेच्या परिपत्रकाचा आधार घेतला होता त्यात प्रवासात ओळखपत्र नसेल तर रेल्वेचा पास अधिकृत ठरून तो प्रवासी वैध ठरत नसल्याचे म्हटले होते. परंतु सुनावणीच्या वेळी ओळखपत्र नाही म्हणून रेल्वे पास वैध नाही, असा दावा योग्य नाही. रेल्वे प्रवाशाला अनेक जखमा झाल्याच्या अवस्थेत त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी करणे अयोग्य असल्याचे स्पष्ट करीत न्या.शिंदे यांनी लवादाला अर्जदारास 31 जुलैपर्यंत नियमानुसार 4 लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहे.

हेही वाचा -डोंगर उतारावर राहणाऱ्यांना मुंबई महापालिकेचा धोक्याचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details