ज्ञानदेव वानखेडे आणि नवाब मलिक दोघांनाही अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश - नवाब मलिक
ज्ञानदेव वानखेडे यांच्या मानहानीच्या दाव्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना वानखेडे यांच्याशी निगडीत कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे.
मुंबई - समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या मानहानीच्या दाव्याची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना वानखेडे यांच्याशी निगडीत कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे.
नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर समीर वानखेडे यांच्या वडिलांनी म्हणजेच ज्ञानदेव वानखेडे यानी कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे. आज या प्रकरणातील पुढील सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने दोघांनाही अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मलिक हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी केलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करणारी कागदपत्र सादर करा, असे आदेश ज्ञानदेव वानखेडे यांना कोर्टानं दिले आहेत. तर मलिकांनी केलेले आरोप खरे आहेत हे सिद्ध करण्याचे निर्देश न्यायालयाने मलिकांना दिले आहेत. या प्रकरणातील पुढील सुनावणी येत्या 12 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.