महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corona : मुंबईत 'या' विभागात सर्वाधिक रुग्ण व मृत्यूंची नोंद! - मुंबईत सर्वाधिक कोरोना मृत्यू विभाग

मुंबईमध्ये ११ मार्च २०२० ला कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण (Corona First Case in Mumbai) आढळून आला तेव्हापासून मुंबईमध्ये कोरोनाच्या तीन लाटा (Corona Third Wave) आल्या. या तीनही लाटा आटोक्यात आणण्यास पालिकेला यश आले (BMC Control Corona) आहे. या दरम्यान मुंबईमध्ये १०५१३७३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १०२६१४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

corona file photo
कोरोना आणि फाईल फोटो

By

Published : Feb 7, 2022, 6:31 PM IST

मुंबई -मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार (Corona Spread) आहे. या प्रसारादरम्यान मुंबईमध्ये अंधेरी, बोरिवली, कांदिवली, मालाड या विभागात सर्वाधिक रुग्णांची नोंद (High Corona Cases in Mumbai) झाली आहे. तर अंधेरी, भांडुप, बोरिवली, मालाड, कांदिवली या विभागात सर्वाधिक मृत्यूंची नोंद (High Corona Patients Death) झाली आहे. मुंबईच्या विशेष करून पश्चिम उपनगरात सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूची नोंद झाली आहे.

  • गेले २ वर्षे कोरोनाचा प्रसार -

मुंबईमध्ये ११ मार्च २०२० ला कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला तेव्हापासून मुंबईमध्ये कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटा आटोक्यात आणण्यास पालिकेला यश आले आहे. या दरम्यान मुंबईमध्ये १०५१३७३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १०२६१४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १६६६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  • या विभागात सर्वाधिक रुग्णांची नोंद -

गेल्या दोन वर्षात मुंबईमध्ये १० लाख ५१ हजार ३७३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण के वेस्ट अंधेरी पश्चिम येथे ९०४८३, के ईस्ट अंधेरी पूर्व येथे ६९२५०, बोरिवली आर सेंट्रल विभागात ६८६१८, कांदिवली आर साऊथ ६३४८७, मालाड पी नॉर्थ विभागात ६१०१४ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वात कमी सँडहर्स्ट रोड बी विभागात ५१५४, मरिन लाईन्स सी विभागात ८७९१, फोर्ट कुलाबा ए विभागात २६७६७ रुग्ण आढळून आले आहेत.

  • या विभागात सर्वाधिक रुग्ण बरे -

गेल्या दोन वर्षात १०२६१४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यापैकी सर्वाधिक के वेस्ट अंधेरी पश्चिम येथे ८८७९५, के ईस्ट अंधेरी पूर्व येथे ६७२५२, बोरिवली आर सेंट्रल विभागात ६७२४१, कांदिवली आर साऊथ ६२१२७, मालाड पी नॉर्थ विभागात ५९६३१ रुग्ण बरे झाले आहेत. तर सर्वात कमी सँडहर्स्ट रोड बी विभागात ४९११, मरिन लाईन्स सी विभागात ८४२४ रुग्ण बरे झाले आहेत.

  • या विभागात सर्वाधिक मृत्यू -

सर्वाधिक मृत्यू के ईस्ट अंधेरी पूर्व येथे १३१८, एस विभाग भांडूप येथे १०६६, बोरिवली आर सेंट्रल ९९९, मालाड पी नॉर्थ विभागात ९९०, कांदिवली आर साऊथ विभागात ९०५ नोंद झाले आहेत. तर सर्वात कमी कुलाबा फोर्ट ए विभागात १७८, सँडहर्स्ट रोड बी विभागात १९५ तर मरिन लाईन्स सी विभागात २६८ मृत्यू झाले आहेत.

  • त्या विभागांवर विशेष लक्ष -

मुंबईमध्ये ज्या विभागात रुग्णसंख्या अधिक आहे त्या विभागावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले जाते त्यांच्यावर उपचार केले जातात. ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत त्यांना घरीच होम क्वारंटाईन केले जाते. त्यांच्या प्रकृतीची आणि ते क्वारंटाईनचे नियम पाळतात का याची रोज माहिती घेतली जाते अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details