महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ST Worker Strike : शिवसेनेला अडचणीत आण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत कर्मचारी संघटनेचा छुपा पाठींबा? - एसटी कर्मचारी आंदोलन

गेल्या महिन्यापासून एसटी कर्मचारी महामंडळाचे विलीनीकरण राज्य सरकारमध्ये ( Merger Of ST Into State Government ) करण्यात यावे, या मागणीसाठी संपावर (ST Worker Strike ) आहेत. यासंपात एसटी कर्मचारी संघटना सहभागी नसल्या तरी, या संपाला मात्र, छुपा पाठींबा असल्याने हा संप दिवसेंदिवस चिघडत जात असल्याची असल्याची चर्चा महामंडळाच्या अधिकारी वर्गात आहेत.

Merger Of ST Into State Government
Merger Of ST Into State Government

By

Published : Dec 14, 2021, 8:38 PM IST

मुंबई -गेल्या महिन्यापासूनएसटी कर्मचारी महामंडळाचे विलीनीकरणराज्य सरकारमध्ये ( Merger Of ST Into State Government ) करण्यात यावे, या मागणीसाठी संपावर (ST Worker Strike ) आहेत. यासंपात एसटी कर्मचारी संघटना सहभागी नसल्या तरी, या संपाला मात्र, छुपा पाठींबा असल्याने हा संप दिवसेंदिवस चिघडत जात असल्याची असल्याची चर्चा महामंडळाच्या अधिकारी वर्गात आहेत.

  • कामगार संघटनेचा छुपा पाठिंबा? -

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात प्रवाशांना अहोरात्र सेवा दिली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूती आहे. २८ ऑक्टोबरपासून आजपर्यंत सुरु असणाऱ्या संपामुळे राज्यातील जनतेला वेठीस धरल्यासारखे झाले आहे. यामुळे शासनाच्या महसूलावर, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, ग्रामीण, निमशहरी भागातील नागरिकांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. हा संप मिटावा, यासाठी परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab ) अनेक प्रयत्न करत आहेत. मात्र, अनिल परब यांच्या प्रयत्नाला अपयश येत असल्याचे चित्र दिसून येते आहे. एसटी कामगाराने हा संप मागे घ्यावा, यासाठी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात वेतन वाढ दिली आहे. मात्र, वेतनवाढ देऊन संप मागे न घेतल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, तरीही कर्मचारी अडून बसले आहेत. आता तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला एसटी महामंडळातील २८ कामगार संघटनेचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा होत आहे.

  • शरद पवार संपावर काढू शकतात तोडगा -

गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळाची धुराही शिवसेनेकडे आहेत. यापूर्वी जेव्हा तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद असताना राष्ट्रवादी प्रणित असलेली महामंडळातील मान्यताप्राप्त संघटनेने संप पुकारला होता. तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय झालेली होती. यंदा सुद्धा शिवसेनेला अडचणीत आण्यासाठी मान्यताप्राप्त कामगार संघटने कृती समितीचा माध्यमातून बेमुदत उपोषण सुरवात केली. नंतर लगेच उपोषण मागे घेतले. मात्र, तेव्हापासून एसटीचा संप दिवसेंदिवस पेटत गेला आहे. मान्यताप्राप्त संघटना ही राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जर ठरवलं, तर ते संपावर तोडगा काढू शकतात, अशी माहिती एसटीचा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याचा अटीवर दिली आहे.

  • या कारणासाठी संपाला छुपा पाठिंबा -

आपल्या विविध मागण्यासाठी मान्यताप्राप्त कामगार संघटनेने मिळून एसटी कामगार कृती समिती स्थापन केली होती. त्यानंतर २७ ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण पुकारले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने एसटी महामंडळासोबत यशस्वी चर्चेअंती आपले आंदोलन २८ आक्टोबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेतले होते. मात्र, एसटी महामंडळ शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशी संप सुरु आहे. या संपाचे नेतृत्व भाजप नेते गोपीचंद परळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याकडे गेले. तेव्हा परळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मान्यता प्राप्त कामगार संघटनेचा भूमिकेला विरोध केला. परिणामी कामगार संघटने आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी कामगार नेते अजयकुमार गुजर यांच्या संपाच्या नोटीसला छुपा पाठींबा दिला आहे.

हेही वाचा -Raj Thackeray on Sachin Waze : 'वाझे आणि अंबानी शिवसेना कार्याध्यक्षांच्या ओळखीचे, मग बॉम्ब कसा ठेवू शकतो' - राज ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details