पनवेल - समुद्र मार्गाने अफगाणिस्तानहून हेरॉइनचा साठा भारतात पाठवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना अनेक दिवसांपासून होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने कारवाई करत, तब्बल 1320 रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. जेएनपीटी बंदरामध्ये ही कारवाई करण्यात आली.
नवी मुंबईत तब्बल १३२० कोटी रुपये किमतीचं हेरॉइन जप्त - Iran
हेरॉइनचा हा मोठा साठा अफगाणिस्तानच्या हेरत येथील 'किला इस्लाम' येथून आला असल्याची माहिती समोर येत आहे. इराणमधील अब्बास बंदराहून समुद्रमार्गे हा साठा मुंबईत आला होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान इथून हेरॉईनने भरलेला कंटेनर जेएनपीटीमध्ये उतरवण्यात आला. पोलिसांनी यावेळी जेएनपीटी कस्टम अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या सहाय्याने या कंटेनरची माहिती मिळविली. दरम्यान, हा कंटेनर पनवेलमधील एका गोदामात ठेवण्यात आला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मिळाली. त्यांनी तातडीने याठिकाणी छापा टाकून हे अंमली पदार्थ जप्त केले.
पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी एक दिल्लीत राहणारा आहे तर दुसरा आरोपी हा अफगाणिस्तानमधील कंधारचा रहिवासी आहे. हेरॉइनचा हा मोठा साठा अफगाणिस्तानच्या हेरत येथील 'किला इस्लाम' येथून आला असल्याची माहिती समोर येत आहे. इराणमधील अब्बास बंदराहून समुद्रमार्गे हा साठा मुंबईत आला होता. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे यावेळी घटनास्थळी दाखल होते.