महाराष्ट्र

maharashtra

राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी - अशोक चव्हाण

By

Published : Nov 16, 2019, 8:32 PM IST

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. मात्र, प्रशासनाने ही मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले..

अशोक चव्हाण

मुंबई -राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी मदत जाहीर केली आहे. मात्र ही मदत तुटपुंजी आहे. तरिही प्रशासनाने ही मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... breaking अयोध्या निकाल : मुस्लिम पक्षकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करणार

काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल, असेही अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हटले आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहूसाठी २ हेक्टरपर्यंत ८ हजार प्रती हेक्टर तर फळबागा व बारमाही पिकांसाठी १८ हजार रूपये प्रती हेक्टर मदत देण्याचा निर्णय राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतला आहे.

हेही वाचा... 'फडणवीस आता मुख्यमंत्री नाहीत.. या मनःस्थितीतून ते अजून बाहेर पडत नाहीत'

राज्यपालांच्या निर्णयासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण यांनी तुटपुंज्या मदतीबाबत नाराजगी व्यक्त केली आहे. तसेच यावेळी चव्हाण म्हणाले की, पावसाने केलेले प्रचंड नुकसान पाहता शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. मात्र राज्यपालांनी जाहीर केलेली मदत पुरेशी नाही. तरीही राज्यात सरकार अस्तित्वात नसताना जाहीर झालेल्या या मदतीचे प्रशासनाने तातडीने वितरण करावे. सदरहू रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी करून अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा सहभाग असलेले सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या या मदतीत अधिक वाढ केली जाईल, असे म्हटले आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details