मुंबई -हेलिकॉप्टर अपघात ( Helicopter Crash ) आणि धाडस हे जणू महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या बाबतीतले समीकरणच आहे. सीडीएस बिपीन रावत ( CDS Bipin Rawat ) यांच्या हेलिकॉप्टर अपघातातील दुर्दैवी निधनानंतर आता महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींसोबत ( Helicopter Crash Incident with Leaders in Maharashtra ) झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनांबाबत जोरदार चर्चा होऊ लागली आहे. यामध्ये दिवंगत माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे ( Former Union Minister Gopinath Munde ), शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांच्यासह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Former Chief Minister Devendra Fadnavis ) यांचा समावेश आहे.
- गोपीनाथ मुंडे आणि अपघात
कार अपघातामध्ये प्राण गमवावे लागलेले दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे तत्पूर्वी अनेक वेळा अपघातांना सामोरे गेले आहेत. गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे महाबळेश्वरला मंत्री मंडळाच्या बैठकीसाठी जात असताना महाड पोलादपूर जवळ अचानक दाट धुके लागले. त्यामुळे हेलिकॉप्टर माघारी फिरवावे लागेल, असे वैमानिकांनी सांगितले होते. मात्र जिथे जागा मिळेल तिथे हेलिकॉप्टर उतरवण्याचा आग्रह मुंडे यांनी धरला. वैमानिकाने जीव मुठीत धरून कसेतरी हेलिकॉप्टर खाली उतरवले. थोडीशी मोकळी जागा मिळाल्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात टळला. त्या दाट झाडीतून वाट काढत मुंडे आणि खडसे मग मुंबई-पुणे रस्त्यापर्यंत चालत आले. त्यानंतर लातूर दौऱ्यावर असतानाही ढगाळ वातावरणामुळे मुंडे यांच्या हेलिकॉप्टरला पुन्हा एकदा अपघातजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागले. मात्र त्यावेळीही न डगमगता मुंडे यांनी हेलिकॉप्टर खाली उतरवायला भाग पाडले होते.
- शरद पवार आणि हेलिकॉप्टरचा किस्सा