मुंबई: यंदा मुंबईत शिंदे गट व ठाकरे गट यांचा दसरा मेळावा एकाच वेळी होणार असून (shivsena dasara melava) मुंबई पोलिसांसमोर त्या दिवशी व्यवस्था सांभाळण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे यावर्षी दसरा मेळाव्याच्या चार-पाच दिवस आधीच वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना रस्त्यावर बंदी घातली आहे. (heavy vehicles ban in mumbai during dasara melava)
Dasara Melava: दसरा मेळाव्या दरम्यान मुंबईत अवजड वाहनांना बंदी - मुंबईत अवजड वाहनांना बंदी
यावर्षीच्या दसरा मेळाव्याच्या चार-पाच दिवस आधीच वाहतूक पोलिसांनी मुंबईत अवजड वाहनांना बंदी घातली आहे. (heavy vehicles ban in mumbai during dasara melava). मुंबईत 5 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते सहा ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी असेल.
या वाहनांना असेल सूट: मुंबईत 5 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते सहा ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी असेल मात्र यातून भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी उत्पादनांची वाहतूक करणारी वाहने यांना सूट असेल. तसेच पिण्याच्या पाण्याचे टँकर, पेट्रोल-डिझेल आणि केरोसीनचे टँकर, रुग्णवाहिका, सरकारी आणि निमसरकारी वाहने, शाळेच्या बसेस आणि दसरा मेळाव्यासाठी येणारी प्रवासी वाहने व खाजगी बसेस यांनाही वगळण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी दिली आहे.
पोलीस उपायुक्तांनी मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 आणि शासकीय अधिसूचना अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करून हे निर्देश मुंबईतील वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.