मुंबई - मुंबईत गुरुवारप्रमाणेच शुक्रवारीही पावसाचा जोर कायम ( Heavy rains in Mumbai ) राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ( torrential rain ) आहे. हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसाचा इशारा ( Rain warning in Konkan ) दिला आहे. तसेच मुंबई, रायगड आणि रत्नागिरीत पावसाबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, राज्यात 6 जुलैपर्यंत अधूनमधून पाऊस सुरू राहणार आहे.
तर मुंबई जलमय -मुंबईत पावसामुळे रेल्वे आणि बससेवेवर परिणाम झाला आहे. सायन, दादर, शिवडी, कुर्ला, चेंबूर, वांद्रे, परळ, वडाळा यासह मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबईत आज सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात हा पाऊस थांबला नाही तर, मुंबईकरांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते.
सतर्कतेचा इशारा -देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईला दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो, त्यामुळे प्रवाशांची आणि रहिवाशांची गैरसोय होते. यापूर्वी रविवारी, आयएमडीच्या प्रवक्त्यानी नागरिकांना सोमवारी बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. "पुढील दोन किंवा तीन दिवसांत शहरात सुमारे 130 मिमी पाऊस पडू शकतो, जो मुंबईच्या मानकांनुसार धोकादायक नसनार आहे मात्र, परंतु त्यामुळे पाणी साचू शकते," असे अधिकारी म्हणाले.