महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पहिल्याच पावसात मुंबईची दैना.. पेंटाग्राफ व ओव्हरहेड वायर तुटल्याने तिन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत - overhead wire

मुंबईत पडलेल्या पहिल्याच पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाइन समजली जाणारी लोकलसेवा ठप्प झाली आहे.

हार्बर आणि मध्य रेल्वे विस्कळीत

By

Published : Jun 10, 2019, 11:01 PM IST

मुंबई -मुंबईमध्ये पावसाचे जोरदार आगमन झाले असून या पावसामुळे मुंबईची लाईफलाइन समजली जाणारी लोकलसेवा ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेच्या कोपर स्टेशनवर पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कोपर स्टेशनवर पेंटाग्राफ दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र पावसामुळे काम करण्यात अडचण येत आहे. या संकटामुळे प्रत्येक स्टेशनवर पोहोचण्यासाठी सुमारे ३० ते ४० मिनिटांचा अवधी लागतो आहे. मुंबई शहरासह उपनगराच्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत मालाड स्थानकाबाहेर पाणी साचले आहेत. तर, ठाण्यात कल्याण, डोंबिवली व वसई विरार भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

तर दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावर माहीम ते वांद्रे स्थानका दरम्यान रात्री 9.40 वाजताच्या सुमारास माहीम ते वांद्रे स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे लोकल 15 ते 20 मिनिटे थांबली होती. त्यानंतर ओव्हरहेड वायर दुरुस्ती करून लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली.

दरम्यान मंगळवारी ११ जून रोजी मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. वेधशाळांच्या निरीक्षणानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होत असून त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबई व किनारी भागामध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details