मुंबई -प्रादेशिक हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, पुढील तीन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस ( Heavy Rains in Maharashtra ) पडू शकतो. दरम्यान कोकण किनारपट्टी भागात सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता हवामान खात्याच्या पुणे प्रादेशिक विभागाच्या वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान राज्यात काही भागात विजाच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे 10 जिल्ह्यात येलो अलर्ट ( Yellow Alerts Issued to Ten Districts of Maharashtra ) जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हवामान कोरडे राहणार आहे.
'या' 10 जिल्ह्यात येलो अलर्ट -
‘राज्यात 29, 30 नोव्हेंबरला कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जेनेसह पावसाची आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे’, असे मुंबईतील हवामान खात्याने ( Regional Meteorological Center Mumbai ) आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, ठाणे या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.