मुंबई -मुंबईत बुधवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने याचा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला. तर मुंबईत काही सखल भागात पाणी साचले ( low-lying areas flooded ) . दरम्यान पुढील ५ दिवस कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल ( heavy rain in Konkan coast ) असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईतही मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा देण्यात आला आहे.
पाणी साचले -मुंबईत ११ जूनला पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. बुधवारी रात्रीपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. गुरुवारी जोरदार पाऊस बरसला. यामुळे सायंकाळपर्यंत मिलन सबवे वगळता कुठेही पाणी साचले नव्हते. मात्र रात्री ८ नंतर जोरदार पाऊस पडल्याने दादर हिंदमाता,काळाचौकी, दादर, शीव स्थानक, शीव-माटुंगादरम्यान, हिंदमाता, माहीम, भक्ती पार्क, दादर-परळ दरम्यान, कुर्ला-शीव दरम्यान, एस व्ही रोड (अंधेरी पश्चिम), कुर्ला एल वॉर्ड परिसर आदी सखल विभागात पाणी साचले. साचलेल्या पाण्यातून मुंबईकर नागरिकांना आपले घर गाठावे लागले.
हेही वाचा -मणिपूरमध्ये भूस्खलन; किमान 16 जणांचा मृत्यू, 70 हून अधिक बेपत्ता
पावसाची जोरदार हजेरी -मुंबईत ११ जूनला पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाच्या सरी पडल्यावर पावसाने पाठ फिरवली होती. काल रात्रीपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली (Heavy rains hit Mumbai ) आहे. आज गरुवारी सकाळी ८ ते आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात मुंबई शहरात १७९.१३, पूर्व उपनगरात १०९.०६ तर पश्चिम उपनगरात १४०.५८ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मिलन सबवे परिसरात पाणी तुंबले होते. अर्ध्या तासात पाण्याचा निचरा झाल्यानंतर मिलन सबवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला अशी माहिती पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान आज शुक्रवारी १ जुलै रोजी दुपारी १.४६ वाजता समुद्राला मोठी भरती आहे. या दरम्यान ४.२५ मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. यावेळी नागरिक आणि पर्यटकांनी समुद्रात किंवा समुद्र किनारी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.