मुंबई - ठाणे, नवी मुंबई परिसरात रात्रभर विजेच्या कडकडाट पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह संपूर्ण उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तापमानही वाढले होते. मात्र किनारपट्टी भागासह पुणे, सतारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतही पाऊस झाल्याने वातावरणात गारवा पसरलाय.
मुंबईसह उपनगरात मुसळधार... विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात
मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात रात्रभर विजेच्या कडकडाट पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह संपूर्ण उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय.
७ आणि ८ सप्टेंबरला कोकण आणि गोव्यात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवरण्यात आली आहे. तर ९ आणि १० सप्टेंबरला कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासह येणाऱया आठवड्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली होती. तसेच काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर होते. मात्र आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणातील गारवा परतला आहे.