मुंबई- विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे रुळांवर माटुंगा, शीव येथे पाणी साचले आहे. दरम्यान, आता पाऊस थांबल्यामुळे चाकरमान्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
मुंबईत पावसाचा जोर वाढला; ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य-हार्बर रेल्वेची वाहतूक उशिराने - पाऊल
ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे रुळांवर माटुंगा, शीव येथे पाणी साचले आहे.
ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक उशिराने
मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी भरण्याचे चित्र होते. हिंदमाता, किंग्ज सर्कल या भागात देखील पाणी भरले होते. तसेच मध्य रेल्वेच्या शीव स्थानकात तर हार्बर रेल्वेच्या चेंबूर रेल्वे स्थानकात ही पाणी भरले होते. दरम्यान, अंधेरी वेस्टर्न एक्स्प्रेसवर मध्यरात्री 3 च्या सुमारास 3 गाड्यांमध्ये टक्कर झाली. या अपघातात 8 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना वाकोला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.