मुंबई- अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाने अति रौद्र रूप धारण केले आहे. रविवारी याचा प्रभाव मुंबईच्या जनजीवनावरही झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या त्याच्या माहितीनुसार चक्रीवादळाने अति रौद्ररूप धारण केले असून वेगवान होत आहे, ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. 180 ते 190 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तौक्तेमुळे मुंबईसह शेजारी जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. रविवारी रात्रीपासूनच दक्षिण मुंबईसह मुंबई उपनगरांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. तरीदेखील मुंबईच्या सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत प्रमाणात सुरू आहे.
मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस, वाहतूक सुरूच - चक्री वादळाचा विमानसेवेवर परिणाम
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे तौक्ते चक्रीवादळाने भीषण रूप धारण केले असून हे वादळ गुजरातच्या दिशेने जात आहे. रविवारी रात्री नऊ वाजल्यापासूनच या चक्रीवादळाचा परिणाम मुंबई वरती जाणवू लागलेला आहे. हे तौक्ते वादळ जस जसे पुढे सरकेल तसे मुंबईत जोरदार वारे देखील वाहू शकतात, असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे.
मुंबईत मुसळधार, मात्र परिस्थिती नियंत्रणात-
तौक्ते चक्रीवादळाचा परिणामामुळे आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगरांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईच्या किनारपट्टीपासून दीडशे किलोमीटर अंतरावर असणारे हे वादळ गुजरातच्या दिशेने जाणार आहे. मुंबईत जोरदार वारे वाहत असून रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत आहे. पावसाचा वेग सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत कुठेही मुंबईमध्ये पाणी साचलेले नाही असं मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आल आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरातील मध्ये पावसामुळे झाड कोसळण्याच्या सहा घटना या झाल्या आहेत अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेली आहे.
वाहतूक सध्या सुरळीत, विमानसेवेवर थोडासा परिणाम-
मुंबईच्या सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक सुरळीत प्रमाणात सुरू आहे. सायन-पनवेल महामार्ग हा पुढे जाऊन पुणे आणि गोवा महामार्गाला जोडला गेला आहे. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. दक्षिण मुंबई आणि मुंबई उपनगर यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. या महामार्गावरील वाहतूक ही सध्यस्थितीत सुरळीत प्रमाणात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच या वादळाचा विमानसेवेवर परिणाम झाला आहे. काही विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तरीदेखील थोड्या वेळामध्ये तौक्ते चक्रीवादळ हे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकणार आहे, त्यामुळे या वादळाचा किती प्रमाणात फटका हा मुंबईच्या पूर्व उपनगरातील भागांना बसणार आहे हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे.