महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत पावसाने घेतला 'ब्रेक', नागरिकांना दिलासा - मुंबई

शुक्रवारी सकाळपासून शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरात 127 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात 170 तर पूर्व उपनगरात 197 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मुंबईत संततधार सुरू; पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या रद्द

By

Published : Jun 29, 2019, 9:09 AM IST

Updated : Jun 29, 2019, 9:53 AM IST

मुंबई- पावसाने शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईला झोडपून काढायला सुरुवात केली होती. मात्र आज सकाळी पावसाने ब्रेक घेतला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली होती. मात्र, शनिवारी पावसाने ब्रेक घेतल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईतल्या काही भागात पावसाच्या सरी पडत असल्या तरी मुसळधार पाऊस पडत नसल्याचे समजते.

मुंबईत दरवर्षी जूनच्या मध्यात पावसाला सुरुवात होते. यंदा मात्र जून संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने मुंबईला पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. अशा परिस्थितीत गुरुवारी रात्री पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी पावसाने चांगलाच जोर धरत मुंबईला झोडपून काढले. शुक्रवार सकाळपासून शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरात 127 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात 170 तर पूर्व उपनगरात 197 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मुंबईत हिंदमाता, किंग सर्कल, कुर्ला, सायन, अंधेरी, कांजूरमार्ग आदी ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. पाण्यातून मार्ग काढत नागरिकांना आपल्या नियोजित ठिकाण गाठावे लागत होते. कांजूरमार्ग रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले. अंधेरी आणि गोरेगांव येथे विजेच्या धक्क्याने 3 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. दादर येथेही मीनाताई ठाकरे फुल बाजाराची भिंत कोसळून 3 जण जखमी झाले. मात्र, आज सकाळी पाऊस थांबल्याने शुक्रवारी दिवसभर त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या सरी पडत असल्या तरी मुसळधार पाऊस पडत नसल्याची समजते.

Last Updated : Jun 29, 2019, 9:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details