मुंबई - शहरात रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. किंगसर्कल भागात तर गुडघ्याच्या वर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या समुद्राला भरती असल्याने पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत आहे.
किंगसर्कल भागात पाणीच पाणी; समुद्राला भरती आल्याने निचरा होण्यास विलंब
किंगसर्कल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दादरकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे.
किंगसर्कल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दादरकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. पालिकेचे कर्मचारी सध्या पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर, वाहतूक पोलीस वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवत आहे.
सायन परिसरात आणि दादर येथील हिंदमाता परिसरात कमरेपर्यंत पाणी भरलं आहे. गांधी मार्केट, अंधेरी सबवे, वाकोला कुर्ला या सारख्या सखल भागात पाणी साचलं, तर इतर ठिकाणचे रस्ते जलमय झाले आहेत. मानखुर्द, गोवंडी, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, भांडूप, मुलुंड या सखल भागात पाणी साचले आहे. वरळी, दादर, मुलुंड, भांडुप, कांजुर, विक्रोळीत रिमझिम पाऊस पडत आहे.