महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पूर्व उपनगरातील विविध भागात जोरदार पाऊस; सखल भागात साचले पाणी - पूर्व मुंबई उपनगर पाऊस न्यूज

कालपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचून रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. याच पावसात पवईत जेव्हीएलआर मार्गावर सांडपाण्याचा नाला फुटला.

Rain
पाऊस

By

Published : Jul 15, 2020, 4:19 PM IST

मुंबई - पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडूप, पवई, विक्रोळी, चेंबूर, कुर्ला या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचून रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. याच पावसात पवईत जेव्हीएलआर मार्गावर सांडपाण्याचा नाला फुटला.

पूर्व उपनगरातील विविध भागात जोरदार पाऊस

कालपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे कुर्ला ते लोकमान्य टिळक टर्मिनस रोडवर रेल्वे कॉलनीत पाणी भरले. या पाण्यातूनच अनेक जण कसरत करत मार्ग काढताना दिसले. मात्र, या रस्त्याच्या बाजूला असलेला लोकल रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. दरम्यान, संततधारेमुळे जेव्हीएलआरसहीत पूर्व द्रुतगती मार्ग आणि एलबीएस मार्गावरील वाहतूकीवर कोणताच परिणाम झालेला नाही. उद्याही मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.

पवईत मोठा नाला फुटला -

पावसाच्या संततधारेत जेव्हीएलआर मार्गावर पवई प्लाझा समोर सांडपाण्याचा मोठा नाला फुटला आहे. याच नाल्यात मलनिस्सारण वाहिनी असून नाल्यातील आणि मलनिस्सारण वाहिनीतील घाण पाणी रस्त्यावर पावसाच्या पाण्यासोबत वाहत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details