महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

येत्या २४ तासांत गोवा अन् कोकणात तुरळक, तर मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा - दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत आहे कमी दाबाचा पट्टा

कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी आणि मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत आणि दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा आहे.

mumbai
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 4, 2020, 9:42 PM IST

मुंबई- पुढील 24 तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी आणि मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत आणि दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा आहे. याबाबतचे निरीक्षण आज सकाळी नोंदविले गेले आहे.

गेल्या २४ तासातील पर्जन्यमान

कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडयात काही ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या २४ तासात राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे

कोकण आणि गोवा - मालवण १९, हरनाई, मुंबई (कुलाबा) १७ सेंमी प्रत्येकी, वेंगुर्ला १५, दापोली १४, बेलापूर (ठाणे), गुहागर, कुडाळ १९ सेंमी प्रत्येकी, चिपळूण, देवगड, पेडणे, राजापूर, सावंतवाडी १० प्रत्येकी सेंमी, दाभोलीम (गोवा), म्हापसा, पनवेल , श्रीवर्धन ९ सेंमी प्रत्येकी, अंबरनाथ, लांजा, केपे, रामेश्वर कृषी, रोहा, उल्हासनगर, वसई ८ प्रत्येकी, दोडामार्ग, कणकवली, म्हसळा, मुरुड, रत्नागिरी, सुधागड पाली, ठाणे, उरण, वैभववाडी ७ प्रत्येकी, भिरा, कानाकोना, कल्याण, खेड, मंडणगड, माणगाव, सांगे, वालपोई ६ प्रत्येकी, भिवंडी, माथेरान, पालघर, पोलादपूर ५ प्रत्येकी, मडगाव, पेण, संगमेश्वर देवरुख, विक्रमगड ४ प्रत्येकी, खालापूर ३, मुरबाड २, जव्हार, कर्जत, महाड, मोखेडा, तलासरी वाडा १ प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र - गगनबावडा ८, महाबळेश्वर ७, साक्री ४, चांदगड, चांदवड, देवळा, लोणावळा (कृषी), सुरगाणा३ प्रत्येकी, आजारा, अकोले, अमळनेर, धुळे, गडहिंग्लज, कळवण, पेठ, फलटण, राधानगरी, सतना, बागलाण, शाहूवाडी २ प्रत्येकी, गारगोटी, हसूल, इगतपुरी, मुळदे, नवापूर, पारोळा, पाटण, संगमनेर १ प्रत्येकी.

मराठवाडा - घनसावंगी, किनवट ६ प्रत्येकी, धारूर, हिमायतनगर ४ प्रत्येकी, कन्नड ३, अंबड, धर्माबाद, लोहा, नायगाव खैरगाव, सिल्लोड २ प्रत्येकी, बदनापूर, केज, माजलगाव, रेणापूर १ प्रत्येकी.

विदर्भ - मानोरा ५. दारव्हा, हिंगणघाट, कामठी, शिंदेवाही, सिरोंचा ४ प्रत्येकी, बाभुळगाव, नेर, वरोरा ३ प्रत्येकी, अहेरी, आरमोरी, बालापूर, बल्लारपूर, बतकुली, चिमूर, दर्यापूर, देवळी, दिग्रस, मंगळुरपीर, मूलचेरा, पारशिवनी, राळेगाव, वाशिम २ प्रत्येकी, संग्रामपूर, सावनेर, यवतमाळ १ प्रत्येकी.

घाटमाथा- ताम्हिणी ९, कोयना (पोफळी), डूंगरवाडी ७ प्रत्येकी, अम्बोणे, दावडी, ४ प्रत्येकी, शिरगाव ३, खोपोली, खद, कोयना (नवजा), भिवपुरी, ठाकूरवाडी १ प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज -

५ जुलै - कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

6 जुलै - कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

८ जुलै - कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

इशारा :

५ जुलै - कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता..

६ जुलै - कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता..

७-८ जुलै - कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

ABOUT THE AUTHOR

...view details