महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत पावसाची संततधार सुरूच; मराठवाडा, विदर्भ कोकणात मुसळधार पावसाची शक्यता - अपडेट पाऊस न्यूज इन मुंबई

आजचा दिवस हा सर्वसाधारण पावसाचा दिवस असेल. ढगाळ वातावरण, तीव्र पाऊस असे साधारण चित्र असेल. विदर्भ, उत्तर कोकण, मराठवाडा येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

rain
संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 28, 2020, 5:01 PM IST

मुंबई -आज दिवसभर मुंबईत पावसाची संततधार सुरूच आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. तसेच अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मागील सहा तासात चेंबूर 90 मिमी, सांताक्रूझ, वांद्रे कुर्ला संकुल 40 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

आजचा दिवस हा सर्वसाधारण पावसाचा दिवस असेल. ढगाळ वातावरण, तीव्र पाऊस असे साधारण चित्र असेल. विदर्भ, उत्तर कोकण, मराठवाडा येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

आज सकाळपर्यंत मुंबईचे तापमान सांताक्रूझ वेधशाळेने कमाल 31 तर किमान 25 असे, तर कुलाबा वेधशाळेत कमाल 31.4 किमान 25.5 तापमान नोंदविले गेले. हवेतील आर्द्रता 87 टक्के आहे. 1 जूनपासून मुंबईत पडलेला पाऊस 2708.1 मिमी इतका आहे.

पुढील हवामानाचा अंदाज:

२८ ऑगस्ट: कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.'

२९ ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.


३० ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.


३१ ऑगस्ट: कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा

२८ ऑगस्ट: विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

२९ ऑगस्ट: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्राच्या घट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

ABOUT THE AUTHOR

...view details