मुंबई- गेल्या आठवड्यात दाणादाण उडवणाऱ्या मुसळधार पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरात जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे, मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. रस्ते वाहतुकीवरही परिणाम होत असून, पश्चिम द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, येत्या ४ तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता - ०२:५३ PM कुर्ला स्थानकात रुळावर पाणी साचल्याने पनवेल ते वडाळा दरम्यान वाहतूक सेवा रद्द.
- ०२:५३ PMमध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल अप आणि डाऊन मार्गावर वळवण्यात आल्या.
- ०२:५३ PMकुर्ला ते सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवांवर परिणाम.
- १२:११ PM हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा, आपत्कालीन परिस्थितीमध्ये ११९६ क्रमांकावर साधा संपर्क.
- १२:१० PM पावसामुळे अकरावीच्या प्रवेशांना ६ जुलैपर्यंत मुदतवाढ, आशिष शेलार यांची माहिती.
- ११:४२ AM मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दुपारसत्रातील शाळादेखील भरणार नाहीत.
- ११:०२ AM मध्य हार्बर रेल्वे उशिराने सुरू.
- १०:३७ AM अंधेरी मालाड सबवे वाहतूकीसाठी बंद.
- १०:२६ AM किंग्स सर्कल येथे पाणी भरले.
- वाहतूक अपडेट : मुंबईत ठिकठिकाणच्या वाहतुकींचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
या मार्गांवर वळवण्यात आली वाहतूक-
साईनाथ सबवे, मालाड रुट नं ३४५, ४६० मदिना मंझिल मार्गे.
दहिसर सबवे सुधीर फडके पुलामार्गे.
मोतीलाल नगर पोस्ट ऑफिस रुट २०१, प्रबोधनकार क्रीडा भवन मार्गे.
दत्त मंदिर रोड कांदिवली (प.), लिंक रोड मार्गे.
बाब्रेकर नगर कांदिवली (प.) हिंदुस्तान नाका कॅप्सुल कंपनीमार्गे.
क्रिश्ना नल्ला बोरिवली, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेमार्गे.
- पालघरमधील शाळांनादेखील जाहीर केली सुट्टी.
- पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी साचले पाणी.
- पश्चिम उपनगरातील दहिसर नदी धोकादायक पातळी ओलांडण्याची शक्यता.
- मुंबईमधील सकाळसत्रातील शाळांना सुट्टी.
- कांदिवलीमधील ठाकूर व्हिलेजमध्ये पाणी शिरले आहे.
- मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत. मात्र, काही गाड्या उशिराने धावत आहेत.
- मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये येत्या चार तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सायन, दादर, माटुंगा, अंधेरी, गोरेगाव आणि मुंबईत किनारपट्टीलगत भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. त्यामुळेच, जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी साचत आहे. पुढील 2 दिवसदेखील असाच पाऊस कोसळणार आहे, असं हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.