महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत पावसाने ४६ वर्षांचा रेकॉड ब्रेक, येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज - मुंबई पाऊस बातमी

यावर्षी मुंबईत झालेल्या पावसाने मागील 46 वर्षांचा विक्रम मोडला. 1974 च्या ऑगस्टमध्ये कुलाबात सर्वाधिक पाऊस म्हणजेच 262 मिमी पडला होता. तोच आता बुधवारी 293.8 मिमी नोंदला गेला.

mumbai rain
मुंबईत मुसळधार पाऊस

By

Published : Aug 6, 2020, 3:21 PM IST

मुंबई - शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आजही मुसळधार पाऊस सुरूच आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस अद्यापही कायम आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटनाही घडल्या. रेल्वे रुळावर पाणी आल्याने लोकलही अडकल्या होत्या. एनडीआरएफ जवानही मदतकार्यात गुंतले आहेत. शिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. हवामान विभागाने येत्या 24 तासांत मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

मुंबईतील पावसाचा प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी घेतलेला आढावा..

दरम्यान, 46 वर्षांच्या पावसाचा मुंबईतील रेकॉर्ड हा कालच्या पावसाने मोडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी सार्वजनिक जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक नागरिक सकाळी कामासाठी घराबाहेर पडले होते. बर्‍याच भागात झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे बर्‍याच भागात पावसामुळे पाणी साचले होते.

यावर्षी मुंबईत झालेल्या पावसाने मागील 46 वर्षांचा विक्रम मोडला. 1974 च्या ऑगस्टमध्ये कुलाबात सर्वाधिक पाऊस म्हणजेच 262 मिमी पडला होता. तोच आता बुधवारी 293.8 मिमी नोंदला गेला. 46 वर्षांनंतर ऑगस्टमध्ये 12 तासांत कुलाबामध्ये 294 मिमी पाऊस पडला. यामुळे अनेक वर्षांनी दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर बरेच पाणी साचले होते. वानखेडे स्टेडियमपासून मरीन लाइन्सपर्यंत पावसाने आपला कहर दाखवला आहे. येत्या 24 ते 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details