महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई सकाळपासून जोरदार पाऊस; नदी-नाल्यांना पूर - मुंबईत मुसळधार पाऊस

राज्यात आणि मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने काल अंदाज वर्तवला होता की पुढील चार दिवस मुंबईसह राज्यभरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. त्यानुसार मुंबईसह उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. काही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे.

जोरदार पाऊस
जोरदार पाऊस

By

Published : Aug 31, 2021, 11:37 AM IST

मुंबई -राज्यात आणि मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने काल अंदाज वर्तवला होता की पुढील चार दिवस मुंबईसह राज्यभरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. त्यानुसार मुंबईसह उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. काही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे.

जोरदार पाऊस

उत्तरेकडे मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, अजमेरपासून दक्षिण छत्तीसगड व परिसर, विशाखापट्टणम ते बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागापर्यंत आहे. तसेच दक्षिण छत्तीसगडच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्रीय वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. याचा परिणाम राज्यभर होताना दिसतो आहे सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर, पूर्व, पश्चिम उपनगर या ठिकाणी जोरदार पाऊस सकाळपासून कोसळत आहेत. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात जास्त प्रभाव जाणवत आहे. कोकणात ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबईतही प्रभाव जास्त असेल. मराठवाड्यात काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details