मुंबई - मुंबईमध्ये पावसाळा सुरु झाल्यापासून दरडी आणि इमारती कोळण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी रात्रीपासून मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. गुरुवारीही पावसाचा जोर कायम होता, यंदा दरम्यान मुंबईमध्ये दोन इमारती कोसळल्या. तसेच रात्रीच्या सुमार पेडर रोड येथे दरड कोसळली आहे. यात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच काल दोन इमारतीचे भागही कोसळले आहेत. ( heavy rain in mumbai ) ( Landslide at pedar road)
दरड कोसळली -मुंबईमध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारीही मुंबईत जोरदार पाऊस पडत होता. यामुळे सखल भागात पाणी साचले. तर रेलवे वाहतूक ठप्प झाली होती. याच दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास पेडर रोड येथील एका इमारतीचे बांधकाम सुरु असताना दरड कोसळली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. या दुर्घटना स्थळाला जिऑलॉजिस्ट भेट देणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दोन इमारती कोसळल्या - गुरुवारपासून जोरदार पावसादरम्यान काळबादेवी बदाम वाडी येथील ३३९, ३४१ ही म्हाडाची ८० वर्षे जुन्या इमारतीची एक विंग दुपारी २ च्या सुमारास कोसळली. दुरुस्तीसाठी या इमारतीची एक विंग खाली करण्यात आली होती. दुसऱ्या विंगमध्ये ६० ते ७० लोक राहत होते. मात्र पावसादरम्यान इमारतीचा काही भाग कोसळल्यावर जिन्याजवळ हे लोक अडकले होते. त्यांना स्थानिक रहिवाशांनी आणि अग्नीशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. तर सायनमध्ये संध्याकाळी ६ च्या गुरुनानक शाळा, हरी मस्जिद जवळील इमारत क्रमांक १५ चा काही भाग कोसळला. ही इमारत रिकामी होती. त्यामुळे कोणीही जखमी झालेले नाही.