महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई, ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता - Next weather forecast

मुंबई व परिसरात गेल्या २४ तासात जोरदार पाऊस झालाय. पुढील 24 ते 48 तासात, मुंबई, ठाणे या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा भागात येत्या 48 तासात मध्यम जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Chance of heavy rain in Mumbai, Thane district
मुंबई, ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

By

Published : Jul 28, 2020, 1:41 PM IST

मुंबई - गेल्या 24 तासात, मुंबई व परिसरात काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. पुढील 24 ते 48 तासात, मुंबई, ठाणे या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा भागात येत्या 48 तासात मध्यम जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मागील 24 तासांत सांताक्रूझ वेधशाळेत 28.6 मिमी तर कुलाबा वेधशाळा 57. 2 मिमी पावसाची नोंद झाली.

मुंबई, ठाणे, पुण्यासह 1 ऑगस्टपासून कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या हिमालय पर्वत रांगांजवळ द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे संपूर्ण उत्तर भारत, पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, बिहार आणि ईशान्य भारतात 29 ते 31 जुलै दरम्यान, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील हवामानाचा अंदाज:

२८ जुलै: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता..

२९-३१ जुलै: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता..इशारा

२८ जुलै: विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

२९ जुलैः कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटहोण्याची शक्यता.

३० जुलै: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याचीशक्यता.

३१ जुलै: कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

ABOUT THE AUTHOR

...view details