मुंबई :मागच्या महिन्यात पावसाने थैमान घातले होते मात्र काही दिवसांनंतर पावसाने उसंत घेतल्याने दिलासा मिळाला होता. परंतु सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. (Weather Update Rain Alert) त्यामुळे पावसाचा परतीचा प्रवास लांबणार असून आगामी चार दिवस कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट ( Yellow alert warning ) जारी केला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबई, पुणे परिसरातही पावसाचा जोर वाढणार आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहान : राज्यातील बहुतांश भागात रविवारी अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. येत्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. राज्यात आगामी 6 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भात जोरदार पावसाच्या इशाऱ्यासह जारी करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील इतर भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. येत्या ४-५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहान हवामान विभागाने केलं आहे.