महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना संकटावर मात करू', उद्योगमंत्र्यांना विश्वास

कॉन्फिड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिजच्यावतीने (सीआयआय) आयोजित ‘सीआयआय हॉस्पिटल टेक-२०२०’ प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने करोना संकटावर मात करण्याचा विश्वास व्यक्त केला.

subhash desai news
'डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने करोना संकटावर मात करू', उद्योगमंत्र्यांना विश्वास

By

Published : Sep 25, 2020, 6:47 AM IST

मुंबई - डिजिटल तंत्रज्ञान आणि साधनांच्या मदतीने आपण कोरोनासारख्या संकटावर सहज मात करू शकतो, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. कॉन्फिड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिजच्यावतीने (सीआयआय) आयोजित ‘सीआयआय हॉस्पिटल टेक-२०२०’ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी देसाई बोलत होते. यावेळी ब्रिटिश उप उच्चायुक्त अॅलन गेमेल, डॉ. रमाकांत देशपांडे, सुधीर मेहता, जॉय चर्कवर्ती आदी उपस्थित होते.

राज्य शासन कोव्हिड संकटावर मात करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोव्हिड चाचणीसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यात आलीय. आयसीयू बेडस् मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा देखील मुबलक आहे. येत्या काळात नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णांची चाचणी केली जाईल. प्रतिदिन सुमारे दीड लाख चाचण्या करण्याचा शासनाचा मानस आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली.

नुकतेच 'माझे कुटुंब; माझी जबाबदारी योजना' शासनाने सुरू केली आहे. त्याद्वारे प्रत्येक व्यक्तिच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. नवीन तंत्रज्ञान नेहमीच उपयुक्त ठरते. त्याचा वापर करून कोरोनासारख्या महामारीवर मात करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उद्योगमंत्र्यांनी सांगितले.

'सीआयआय'च्या वतीने राबवण्यात येत असलेल्या टेली आयसीयू प्रकल्पास राज्य शासन सर्व सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चार दिवस चालणाऱ्या या डिजिटल प्रदर्शनात 60 हून अधिक देशातील कंपन्या सहभागी होणार आहेत. आरोग्यविषयक 300 पेक्षा अधिक उत्पादने या प्रदर्शनात ठेवली जाणार आहेत. या उपक्रमास नेदरलँडने 'भागीदार देश' म्हणून पाठिंबा दर्शवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details