मुंबई :केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे ( Mla Nitesh Rane) यांच्यावर दिशा सॅलियन (Disha Salian) प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. मालवणी पोलीस ठाण्यात (Malvani Police Station) नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, याकरिता राणे पिता पुत्रांकडून याचिका दाखल करण्यात आली होती. दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांच्या विनंतीवरून, उच्च न्यायालयाने (High Court) सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली आहे. या याचिकेवर 29 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहेत.
मालवणी पोलीस ठाण्यात नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी, राणे पिता पुत्र यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी राजकीय दबावातून गुन्हा नोंदवल्याचा दावा राणे पितापुत्रांने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. राणे पितापुत्रांना याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 19 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी दिशा सालियन वर लैंगिक अत्याचार करुन, तीची हत्या करण्यात आली व ती गरोदर होती असा दावा केला होता. याविरोधात दिशा सालियनची सातत्याने होणारी बदनामी थांबवावी, अशी विनंती सालियान कुटुंबियांनी वारंवार केली होती. त्यानंतरही राणे कुटुंबीयांकडून बदनामी थांबवण्यात न आल्याने, अखेर सालियान यांच्या कुटुंबीयांनी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार :केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दिशा सालियनची हत्या झाल्याची सांगत, तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. पोलिसांनी हा अहवाल दिला आहे. त्यात दिशाच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून मृत्यूवेळी ती गरोदर नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी राणे पितापुत्रांविरोधात खोटे आरोप केल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणी राणे पितापुत्रांविरोधा गुन्हा दाखल करून घेतला होता.