रिया चक्रवर्तीसह सहा जणांच्या जामीन याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने सर्वांना जामीन नाकारला आहे. यासंबंधी आमचे प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी न्यायालयीन कामकाजाचा आढावा घेतला आहे. तसेच, या सहा जणांपैकी एक असलेल्या दिपेश सावंतचे वकील अली गुबेरे यांच्याशीही संवाद साधला आहे. न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर सर्वच जणांकडून उच्च न्यायालयात पुन्हा एकदा जामिनाची मागणी करण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या सध्याच्या आदेशानुसार रियासह सर्वांना 22 सप्टेंबरपर्यंत कोठडी मिळाली आहे.
रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज मुंबई विशेष न्यायालयाने फेटाळला - शोविक जामीन अर्ज सुनावणी
12:57 September 11
उच्च न्यायालयात पुन्हा एकदा जामिनाची मागणी करण्याची शक्यता
12:34 September 11
रियासह सर्व जणांना 22 सप्टेंबरपर्यंत कोठडी
एकदा आम्हाला न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाली की आम्ही पुढच्या आठवड्यात या निर्णयाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात जावे किंवा नाही, याविषयी निर्णय घेऊ, असे रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या आताच्या निकालानुसार, रियासह सर्व जणांना 22 सप्टेंबरपर्यंत कोठडी मिळाली आहे.
12:18 September 11
सर्वांचा जामीन अर्ज मुंबई विशेष न्यायालयाने फेटाळला
मुंबईच्या विशेष न्यायालयाने शोविक चक्रवर्ती, रिया चक्रवर्ती, अब्दुल बासित, जैद विलात्रा, दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. त्यांना सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणात एनसीबीने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) अटक केली आहे.
11:51 September 11
रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज मुंबई विशेष न्यायालयाने फेटाळला
रिया चक्रवर्तीचा जामिनावर थोड्या वेळात मुंबई सेशन कोर्टाचा येणार निकाल. रियासोबत भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या जामीन अर्जावरही न्यायालय देणार निकाल.