परमबीर सिंग यांच्या याचिकेवरील सुनावणी सुरू असून, तुम्ही केलेले आरोप हे केवळ ऐकीव गोष्टींवर केलेत का असा प्रश्न न्यायालयाने परमबीर सिंग यांना विचारला आहे. पाहा या सुनावणीतील ठळक मुद्दे..
- "मुंबई पोलीस आयुक्त या नात्यानं याप्रकरणी गुन्हा दाखल करणं ही तुमचीच जबाबदारी होती. तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात", हायकोर्टाची परमबीर सिंग यांच्यावर बोचरी टीका.
- तुमचे वरीष्ठ जरी कायदा मोडत असतील तरी, त्याची तक्रार देऊन गुन्हा दाखल करण ही तुमचीच जबाबदारी आहे - मुंबई उच्च न्यायालय
- परमवीर सिंगांच्या वकिलांनी रश्मी शुक्ला ह्यांच्या अहवालाचा संदर्भ दिला.
- या प्रकरणात एफआयआर का दाखल केला नाही? मुख्य न्यायमूर्ती , उच्च न्यायालय
- परमवीर सिंग यांच्या वकिलांनी तेव्हाच्या डीजीपी महाराष्ट्र ह्यांना राज्य गुप्तचर विभाग आयुक्त यांनी लिहिलेले पत्र वाचले.
- परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा संदर्भ वकिलांच्या वतीने देण्यात आला.
- ह्या प्रकरणात एफआयआर कुठे नोंदवला आहे? उच्च न्यायालयाकडून परमवीर सिंगांच्या वकिलांना सातत्याने प्रश्न.
- गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटींची मागणी तुमच्यासमोर केली होती का? - हायकोर्टाचा याचिकाकर्ते परमबीर सिंग यांना सवाल.
- हे केवळ ऐकीव गोष्टींवर केलेले आरोप आहेत का? - हायकोर्ट.
- तुमच्या ऑफिसर्सनी तुम्हाला तोंडी सांगितलं, मात्र तुमच्याकडे याचे काहीही पुरावे आहे का? - हायकोर्ट
मुंबई-परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज (बुधवार) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंग यांनी दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपंकर दत्ता यांचे खंडपीठ याचिकेवर सुनावणी करणार आहे.
हेही वाचा -अभ्यासाचे साहित्य जळाले, वसतीगृहाला आग, ७४ विद्यार्थ्यांचा थोडक्यात वाचला जीव