महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bully Bai App Case : बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपी श्‍वेता सिंगच्या जामीन अर्जावर 8 फेब्रुवारीला सुनावणी - What is Bully Bai App

बुली बाई ॲप प्रकरणात ( Bully Bai App Case ) मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पथकाने अटक केलेले महिला आरोपी श्‍वेता सिंगची बांद्रा कोटाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर श्‍वेता सिंगच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली त्यावेळी मुंबई सत्र न्यायालयाने मुंबई सायबर सेल ला या प्रकरणात 5 फेब्रुवारी पूर्वी रिप्लाय सादर करण्याचे निर्देश दिले होते मात्र आज मुंबई सायबर सेल ने पुन्हा रिप्लाय सादर करण्याकरिता वेळ मागून घेतला असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Bully Bai App Case
बुली बाई ॲप प्रकरण

By

Published : Feb 5, 2022, 5:00 PM IST

Updated : Feb 5, 2022, 8:00 PM IST

मुंबई -बुली बाई ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पथकाने अटक केलेले महिला आरोपी श्‍वेता सिंगची बांद्रा कोटाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर श्‍वेता सिंग च्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली त्यावेळी मुंबई सत्र न्यायालयाने मुंबई सायबर सेलला या प्रकरणात 5 फेब्रुवारी पूर्वी रिप्लाय सादर करण्याचे निर्देश दिले होते मात्र आज मुंबई सायबर सेल ने पुन्हा रिप्लाय सादर करण्याकरिता वेळ मागून घेतला असून आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

  • विशाल कुमार झाच्या याचिकेवर 9 फेब्रुवारीला निकाल -

बुल्ली बाई अ‍ॅप प्रकरणात बंगलोर येथून पहिला आरोपी असलेले विशाल कुमार झाच्या याचिकेवर आज (शनिवार) निकाल येणार होता पण आज काही कारणास्तव निकाल राखून ठेवला आहे. आता या निकाल 9 फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याचे न्यायमूर्ती यांनी सांगितले आहे. बुल्ली बाई या ॲपच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील महिलांची हेतूपुरस्सर बदनामी केल्याप्रकरणी अटकेत करण्यात आली होती यापूर्वी बांद्रा कोर्टाने विशाल कुमार झा याचा जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावरील युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. निकाल 9 फेब्रुवारीला लागणार आहे.

  • श्‍वेता सिंगला उत्तराखंडमधून केली होती अटक -

बुली बाई ॲप प्रकरणात श्‍वेता सिंग यांना उत्तराखंडमधून मुंबई सायबर सेलने अटक करण्यात आले होते. या प्रकरणात पहिला आरोपी विशाल झा याला बेंगलोरमधून अटक केल्यानंतर विशाल झाच्या माध्यमातून श्‍वेता सिंगला उत्तराखंडमधून अटक करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी 7 जानेवारी रोजी श्‍वेता सिंगला मुंबईत आल्यानंतर तीन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

  • आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल -

बुली बाई एक असे ॲप्लिकेशन आहे. जिथे प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो लावले जात होते आणि त्यांची बोली लावली जात होती. या ॲपवर आतापर्यंत 102 मुस्लिम महिलांचे फोटो लावण्यात आले होते. या प्रकरणावरुन विविध स्तरांतून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. तसेच अनेकांनी या ॲप विरोधात तक्रारीही दाखल केल्या होत्या. ज्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं या आरोपींविरोधात आयपीसी कलम 354D, 509, 500, 153A, 295A, 153B, IT च्या कलम 67 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरु केला होता.

  • काय आहे बुली बाई अ‍ॅप? (What is Bully Bai App)

मुस्लिम महिलांचा लिलाव करणारे एक अ‍ॅप सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. याच अ‍ॅपचे नाव आहे बुली बाई अ‍ॅप यावर कथितपणे मुस्लिम महिलांना टार्गेट करुन त्यांना अपमानित केले जात होते. या अ‍ॅपची माहिती समोर येताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उद्रेक पहायला मिळाला. असा आरोप आहे की, हे बुली बाई अ‍ॅप मुस्लिम महिलांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन त्यांचे फोटो डाऊनलोड करुन लिलावासाठी पोस्ट करत होते.

  • 100 मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड -

पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुली बाई ॲपप्लिकेशनवर जवळपास 100 प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले होते. ज्यामध्ये काही पत्रकार महिलांच्या फोटोचा अपलोड करण्यात आले होते. तसेच त्यांची बोलीही लावली जात होती. या प्रकरणात आतापर्यंत मुंबई सायबर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेलला बुली बाईशी संबंधित 3 ट्विटर हँडलची माहिती मिळाली. पोलिसांनी हे ॲपप्लिकेशन तयार करणाऱ्या गुगलला पत्र लिहून हे ॲपप्लिकेशन बंद करण्याचे सांगितले होते. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ते आता त्या सर्व महिलांना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी बोलावत आहेत. तांत्रिक विश्लेषण करण्याचे कामही मुंबई पोलिसांकडून केले जात आहे.

हेही वाचा -Bully Bai App Case : बुलीबाई ॲप प्रकरणातील आरोपी श्‍वेता सिंहच्या जामीन अर्जावर ५ फेब्रुवारीला सुनावणी

Last Updated : Feb 5, 2022, 8:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details