महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

OBC Reservation : 19 जुलैला होणाऱ्या सुनावणीमध्ये ओबीसी समाजाला दिलासा मिळेल - छगन भुजबळ

येत्या 19 जुलैला होणाऱ्या पुढील सुनावणीमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या जातील याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलवलेल्या बैठकीनंतर ( NCP Meeting At Yashwantrao Chavan Center ) प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी हा विश्वास व्यक्त केला.

NCP leader Chhagan Bhujbal
राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ

By

Published : Jul 12, 2022, 5:46 PM IST

मुंबई -ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) झालेल्या आज सुनावणीनंतर ओबीसी समाजाला दिलासा मिळाला असल्याचे मत ओबीसी नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ( NCP leader Chhagan Bhujbal ) यांनी व्यक्त केल आहे. 19 जुलैला होणाऱ्या पुढील सुनावणीमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या जातील याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक -यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलवलेल्या बैठकीनंतर ( NCP Meeting At Yashwantrao Chavan Center ) प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी हा विश्वास व्यक्त केला. ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने ( Mahavikas Aghadi Government ) सर्वतोपरी प्रयत्न केले होते. ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आज जो अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला त्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नातूनच अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर सादर झाला आहे. तसेच या अहवालात काही त्रुटी असू शकतील. मात्र या अहवालामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळाला असल्याचे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा -राष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून उमेदवार असलेल्या द्रोपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेनेकडून देखील मुर्मू यांनाच पाठिंबा देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असली तरी, अद्याप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांच्या काही खासदारांकडून मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा अशा बातम्या समोर येत असल्या तरी, त्याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील. कोणाला पाठिंबा द्यायचा हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे मतही यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. तसेच सध्या शिवसेनेमध्ये उद्भवलेली परिस्थिती अनेक वेळा राजकीय पक्षांवर ती उद्भवत असते. या परिस्थितीतून उद्धव ठाकरे मार्ग काढतील आपल्या पक्षाला सावरण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. राज्यातील सत्तापालट झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांनी ही बैठक बोलावली असून, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना पुढील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी कामाला लागण्याच्या सूचना शरद पवार यांनी केल्या आहेत. सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा तसेच विरोधी पक्षात असला तरी जनतेची कामे होण्यासाठी प्रयत्न करा असा सूचना शरद पवारांनी या बैठकीतून दिले असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही आघाडी व्हायला हवी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. मात्र याबाबत तिन्ही पक्षांनी एकत्र बसून निर्णय घ्यावे असे मतही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफ, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

हेही वाचा -Mukhtar Abbas Naqvi: लोकसंख्येचा स्फोट हा कोणत्याही धर्माची नसून ती देशाची समस्या आहे -नकवी

ABOUT THE AUTHOR

...view details