मुंबई -काही दिवसांतच वारीला सुरुवात होणार आहे. यात जवळपास दहा ते पंधरा लाख वारकरी सहभागी होतात. वारी बाबतचे आयोजनही शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र सध्या कोरोनाचे सावट पुन्हा एकदा गडद होत आहे. त्यामुळे कोरोनाबाबतची काळजी घेऊन आषाढी वारी ( Ashadi Wari 2022 ) पार पाडली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी दिली आहे. आज ( सोमवारी ) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ( State Cabinet Meeting ) दिंडी तसेच त्याच्या आयोजनाबाबत देखील चर्चा झाली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. शिवाय बैठकीत कोरोना खबरदारीबाबत चर्चा झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
'नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा' :मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड आणि नवी मुंबई या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येवर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून, याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. शिवाय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची काही लक्षणे जाणवतच आहेत. मात्र अद्याप त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला नाही. पण राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने सध्या काळजी घेतली पाहिजे, अशा सूचना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देण्यात आल्या असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
कलाकार कोरोना पॉझिटिव्ह : निर्माता दिग्दर्शक करण जोहर यांच्या घरी वाढदिवसाच्या झालेल्या पार्टी नंतर अनेक कलाकारांना कोरोना झाला असल्याचा उल्लेख आवर्जून आरोग्य मंत्र्यांनी केला. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात घेतलेल्या बैठकीत दिलेले निर्देश :