मुंबई -मंकीपॉक्स या आजाराची भीती संपूर्ण जगाला लागली आहे. राज्य सरकारने देखील या बाबतची खबरदारी बाळगली असून अद्याप भारतात मंकीपॉक्सची एकही रुग्ण आढळलेला नाही. या रोगाचा प्रादुर्भाव दक्षिण आफ्रिका या देशातून सुरू झाला आहे. ब्रिटन आणि अमेरिका या देशांमध्ये देखील या आजाराचे रुग्ण सापडतात आहेत. मात्र अद्याप मंकीपॉक्सची रोगाचे रुग्ण आपल्या देशात नसल्याचे आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ( Heath Minister Rajesh Tope On Monkeypox ) सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही -तसेच मंकीपॉक्सची विषाणू हवेतून पसरत नाही. रोग असणाऱ्या माणसाचा स्पर्श इतर माणसाला झाल्यास किंवा प्राण्याचा स्पर्श माणसाला झाल्यास हा रोग पसरतो. पुरळ येणे, ताप येणे अशी लक्षणे या रोगाची आहेत. या रोगात मृत्यूचे प्रमाण एक ते दहा टक्के एवढे असते असे मत तज्ञांचे आहे. मात्र अद्याप देशात एकही रुग्ण आढळलेला नाही. या रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या देशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे विमानतळावर स्क्रीनिंग केले जाते. त्यामुळे याबाबत नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही. मात्र याबाबत कोणत्याही नागरिकाला संशय असल्यास त्यांनी आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
चिकनपॉक्स सारखा आहे विषाणू, मात्र घातक -तज्ज्ञांच्या मते मंकीपॉक्स विषाणू भारतात आढळणाऱ्या चिकनपॉक्स सारखा आहे. यामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये मोठमोठाले दाने किंवा फोडं येतात. जो पण या विषाणूने संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येतो, त्याला पण मंकीपॉक्स होण्याचा धोका बळावतो. हा जुना विषाणू आहे, मात्र अमेरिकेत याच्या प्रवेशाने आरोग्य संगठना सतर्क झाल्या आहेत.