मुंबई - देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांतील कोरोना रुग्णस्थितीचा आढावा ( PM Narendra Modi Reviews Covid Situation ) घेतला. राज्यात कोरोना बरोबरच ओमायक्रॉन ( Omicron In Maharashtra ) वाढत आहे. त्यामुळे लसीकरणावर ( Vaccine Booster Dose Maharashtra ) भर देण्याची गरज असून, महाराष्ट्राला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा करावा, अशी लेखी मागणी केल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope Demands Provide Covid Vaccine ) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
पंतप्रधानांनी बोलूच दिले नाही
बैठकीत पंतप्रधानांनी अनेक मुख्यमंत्र्यांना बोलू दिले नाही. मला प्रत्यक्ष बोलून बाजू मांडायची संधी मिळाली नाही. त्यामुळे आम्ही लेखी निवेदन सादर केल्याचे टोपे यांनी सांगितले. आम्ही केंद्राकडे कोविशिल्ड ५० लाख आणि कोव्हॅक्सिन ४० लाखची मागणी केली. ट्रिटमेंट पद्धतीसाठी केंद्रानं मार्गदर्शन करावं. कोविड खर्च काही बाबतीत तफावत आहे. केंद्राने लसीकरणाबाबत जो काही राष्ट्रीय कार्यक्रम सुरु आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि वयोवृद्धांना बुस्टर डोससाठी कोव्हॅक्सिन लस कमी पडत आहे. त्यामुळे केंद्राकडे वाढीव लसीच्या पुरवठ्याची मागणी केली आहे. काही लोकांचा गैरसमजातून लसीकरणाला विरोध असतो. त्यामुळे केंद्राकडून याबाबत काही नियमावली करता येईल का? अशी विचारणा केली आहे. तसेच चाचणीकरिता होम किट्स आणि रॅपिड अँटिनेन टेस्टद्वारे जे लोक पॉझिटिव्ह येत आहेत त्याची माहिती मिळत नाही. याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. आर्थिक नुकसान न होता सर्व गोष्टी कराव्यात हे पंतप्रधानांनी सांगितलं आहे, असे टोपे म्हणाले. तसेच रॅपिड अँटिजेंन किट्स जिथे कमी दर मिळतील तिथून घ्यावे. जेम पोर्टलवर दर जास्त असेल तर घेऊ नये, असे आवाहन देखील टोपे यांनी केले.
डेल्टा व्हेरियंट आजही प्रभावी