मुंबई- राज्यात आज १५६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ७८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३६०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४७ हजार ९६८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात सध्या ५४ शासकीय आणि ४१ खासगी अशा एकूण ९५ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ९ हजार ३१७ नमुन्यांपैकी ९७ हजार ६४८ नमुने पॉझिटिव्ह (१६ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७३ हजार ६०६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ४९३ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे
ठाणे- ११९ (मुंबई ९७, मीरा-भाईंदर ९, कल्याण-डोंबिवली ७, नवी मुंबई ४, वसई-विरार २), नाशिक- ५ (नाशिक ५), पुणे- १६ (पुणे ८, सोलापूर ८), कोल्हापूर- १ (रत्नागिरी १), औरंगाबाद-८ (औरंगाबाद ६, हिंगोली १, जालना १), लातूर -३ (लातूर २, नांदेड १).
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी १०२ पुरुष तर ५० महिला आहेत. आज नोंद झालेल्या १५२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ८५ रुग्ण आहेत. तर ५४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या १५२ रुग्णांपैकी १०७ जणांमध्ये ( ७०.३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३५९० झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित मृत्यू १ एप्रिल ते ८ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ११७ मृत्यूंपैकी मुंबई ८७, मीरा भाईंदर -८, कल्याण डोंबिवली ७, सोलापूर -७, नवी मुंबई -४, नाशिक -३ आणि वसई विरार १ असे आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय अॅक्टीव्ह रुग्णांचा तपशील
*मुंबई महानगरपालिका:* बाधीत रुग्ण- (५४,०८५), बरे झालेले रुग्ण- (२४,२०९), मृत्यू- (१९५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(७), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७,९१५)
*ठाणे:* बाधीत रुग्ण- (१५,६७९), बरे झालेले रुग्ण- (६२३४), मृत्यू- (३९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०४६)
*पालघर:* बाधीत रुग्ण- (१८४२), बरे झालेले रुग्ण- (६८७), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११०८)
*रायगड:* बाधीत रुग्ण- (१६३६), बरे झालेले रुग्ण- (१०२०), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५६)
*नाशिक:* बाधीत रुग्ण- (१७४६), बरे झालेले रुग्ण- (११६४), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८२)
*अहमदनगर:* बाधीत रुग्ण- (२२४), बरे झालेले रुग्ण- (१४७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६८)
*धुळे:* बाधीत रुग्ण- (३४१), बरे झालेले रुग्ण- (१६१), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५४)
*जळगाव:* बाधीत रुग्ण- (१३३६), बरे झालेले रुग्ण- (६००), मृत्यू- (१२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४६)
*नंदूरबार:* बाधीत रुग्ण- (४५), बरे झालेले रुग्ण- (३०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११)
*पुणे:* बाधीत रुग्ण- (१०,८८२), बरे झालेले रुग्ण- (६२०८), मृत्यू- (४४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२२७)
*सोलापूर:* बाधीत रुग्ण- (१५७८), बरे झालेले रुग्ण- (६५४), मृत्यू- (१२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८०४)
*सातारा:* बाधीत रुग्ण- (७०१), बरे झालेले रुग्ण- (३८४), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९०)
*कोल्हापूर:* बाधीत रुग्ण- (६७५), बरे झालेले रुग्ण- (५०४), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६३)
*सांगली:* बाधीत रुग्ण- (१९५), बरे झालेले रुग्ण- (१०८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८३)
*सिंधुदुर्ग:* बाधीत रुग्ण- (१४५), बरे झालेले रुग्ण- (५३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९२)