महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जेजे रुग्णालयात डोंगरी दुर्घटनेतील लोकांची घेतली भेट

डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर यात 10 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी असल्याची अधिकृत माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जेजे रुग्णालयात दुर्घटनेतील लोकांची भेट घेतली

By

Published : Jul 17, 2019, 1:33 AM IST

मुंबई-आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी जे जे रुग्णालयात जाऊन डोंगरीतील केसरबाई इमारत दूर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. तसेच त्यांच्या उपचारा संदर्भात डॉक्टरांशी चर्चाही केली. जखमींना उपचारासाठी सर्व मदत करण्याचे आदेशही यावेळी आरोग्य मंत्र्यांना डॉक्टरांना दिले.

आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जेजे रुग्णालयात दुर्घटनेतील लोकांची भेट घेतली

डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री विखे पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर यात 10 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी असल्याची अधिकृत माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

या घटनास्थळाला आता राजकीय नेते, मंत्री भेट देत असल्यामुळे तेथील यंत्रणेवरदेखील ताण येत आहे. दुर्घटनाग्रस्त इमारती शेजारील इमारतींनाही तडे गेल्याने तेथील रहिवाशांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details