महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Phone Pay : महाराष्ट्राला पुन्हा धक्का; आता 'फोन पे' चे कार्यालयही मुंबईतून 'या' राज्यात जाणार - Phone Pay company

फोन पे कंपनीचे ( Phone Pay company ) मुख्यालय हे मुंबईत होतं. मात्र, आता या कंपनीचा हे मुख्य कार्यालय मुंबईतून कर्नाटकात ( Phone Pay is headquartered in Karnataka ) हलवण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापाने घेतला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Sep 22, 2022, 2:25 PM IST

मुंबई -ऑनलाइन पेमेंटसाठी प्रसिद्ध असलेली फोन पे कंपनीचे ( Phone Pay company ) मुख्यालय हे मुंबईत होतं. मात्र, आता या कंपनीचा हे मुख्य कार्यालय ( Headquarters of the Phone Pay company ) मुंबईतून कर्नाटकात ( Phone Pay is headquartered in Karnataka ) हलवण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापाने घेतला आहे. कंपनीचं मुंबईतील कार्यालय कर्नाटकला हलवण्याबाबत कंपनीने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कंपनीने तिचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात बदलण्यास सक्षम होण्यासाठी कंपनी कायदा, 2013 च्या कलम 13 अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज प्रस्तावित केला आहे. ज्यासाठी कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफारची पुष्टी मिळावी. यासाठी 16 ऑगस्ट, 2022 येथे झालेल्या आमसभेत विशेष ठराव मंजूर करण्यात आला. कंपनीच्या झालेल्या आमसभेत कंपनीचे कार्यालय कर्नाटक राज्यात हलवण्याचा निर्णय घेतला असल्याचा नमूद करण्यात आला आहे.

phone pay

फोन पे ही कर्नाटकात - वेदांता ग्रुप ( Vedanta Group ) फॉक्स कॉन समूहाचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्यामध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता फोन पे सारखी ऑनलाईन पेमेंट करणारी मोठ्या कंपनीचा कार्यालय इतर राज्यात जात असल्याने राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. मुंबईतील कार्यालय कर्नाटकला हलवण्याच्या मुद्द्यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावत मुंबईचे मतदार मतदानातून धडा शिकवतील असा इशारा भारतीय जनता पक्षाला दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details