महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

"तुम्ही देवदूत असल्याचे जनतेसमोर भासवले", कोव्हिड औषधे पुरविणे सोनू सुदला भोवणार

मुंबई उच्च न्यायालयात कोरोना संदर्भातील याचिकांवर आज सुनावणी करताना विनापरवाना रेमडेसिवीर औषध वाटपचा मुद्दा परत चर्चेत आला. विनापरवाना रेमडेसिवीरचे वाटप केल्याबद्दल हायकोर्टाने गंभीर निरीक्षणे नोंदवली.

mumbai High Court
mumbai High Court

By

Published : Jun 16, 2021, 4:36 PM IST

Updated : Jun 17, 2021, 4:57 PM IST

मुंबई -मुंबई उच्च न्यायालयात कोरोना संदर्भातील याचिकांवर आज सुनावणी करताना विनापरवाना रेमडेसिवीर औषध वाटपचा मुद्दा परत चर्चेत आला. विनापरवाना रेमडेसिवीरचे वाटप केल्याबद्दल हायकोर्टाने गंभीर निरीक्षणे नोंदवली. दरम्यान, या प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिला आहे, की कोरोना औषधांसदर्भात सोनू सुद यांनी केलेल्या मदतीची सखोल चौकशी करण्यात यावी. परवाना नसतानाही ही औषधे कशी मिळवली आणि वितरीत केली, याची चौकशी व्हायला हवी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने या दोन्ही प्रकरणात सेलिब्रिटींनी थेट लोकांशी संपर्क साधत औषधांचा पुरवठा केला. संकटकाळात आपण कुणी देवदूत असल्यासारखा त्यांचा वावर होता, असे सांगत मात्र हे करत असताना आपण ही औषधे योग्य मार्गाने मिळवतोय की नाही?, याचा त्यांना विसर पडला. असा थेट खोचक प्रश्न विचारत मुंबई उच्च न्यायालयाने सोनू सुद सह अन्य सेलिब्रिटींना टोला लगावला.

हेही वाचा-नवरा इंजिनिअर, पगार १.५ लाख, तरीही बायकोने रचला १ Cr खंडणीचा कट

तसेच उद्या कोणीही उठेल आणि सोशल मीडियावर लोकांना आवाहन करेल की, सरकार तुमची मदत करत नाही तर आम्ही आहोत, हा प्रकार योग्य नाही", असे गंभीर निरीक्षण नोंदवत कोरोनाकाळात रेमडेसिवीरच्या गैरवाटपावरून हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा-हातावर मेहंदी लागन्याआधीच कोरोनाने केला घात, आईनंतर अवघ्या १० दिवसांत मुलीचंही निधन

सोनू सूद फाऊंडेशनच्याबाबतीत रेमडेसिवीर एकाने दुस-याला दिली आणि मग दुस-याने तिस-याला दिली, असा प्रकार झालाय. रेमडेसिवीरचा साठा 'सिप्ला' कंपनीच्या भिवंडी गोदामातून आणण्यात आला. तसेच हा साठा सरकारच्या अपरोक्ष पोहचवल्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे हायकोर्टात देण्यात आली.

हेही वाचा-नागपुरात तालिबानी शिरकाव, अफगाणी नागरिकाला अटक, तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर करत होता फॉलो

त्यावर याप्रकरणात सरकारने योग्य ती कारवाई करावी, अशी आमची अपेक्षा आहे. असे हायकोर्टाने म्हटले आहे.

Last Updated : Jun 17, 2021, 4:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details