मुंबई -समलिंगी (गे) तरुण तरुणीला Grindr गे चॅट अॅप ( Grindr Gay Chat App ) च्या माध्यमातून संपर्क करून त्यांच्याकडून अनैतिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. येथील तीन आरोपींनी या अॅपच्या माध्यमातून एका समलिंगी तरुणाशी संबंध साधला व त्याला भेटण्यासाठी बोलावून त्यासोबत असभ्य वर्तन केले. त्याचे न्यूड व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या एका टोळीला मुंबईच्या मालवणी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांची प्रतिक्रिया अॅपच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क -
पोलिसांनी सांगितले की, अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण माहिती भरावी लागते, त्यानंतर त्या भागातील सर्व गे टाईप मुले तपशीलात लोकेशन असलेल्या भागात एकमेकांशी संपर्क साधतात. त्या अॅपद्वारे एकमेकांशी संपर्क साधून एकत्र भेटतात आणि गप्पा मारतात.
न्यूड व्हिडिओ बनवून केली पैशाची मागणी -
मालवणीचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांनी सांगितले की, १७ जानेवारीच्या रात्री एका हाय-प्रोफाइल मुलाचे आरोपींशी ‘गे अॅप’द्वारे संपर्क केला. काही दिवस ऑनलाइन चॅटिंग केल्यानंतर आरोपीने त्याला भेटण्यासाठी बोलावले. जेव्हा पीडित तरुण त्याला भेटली. आम्ही भेटायला गेलो तेव्हा 5 आरोपींनी तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी करायला सुरुवात केली. मात्र तरुणाने नकार दिल्याने आरोपींनी त्याला मारहाण करून त्याचा आयफोन, डेबिट कार्ड, रोख रक्कम हिसकावून घेतली. तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवला, सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्याची आणि व्हिडिओ डिलीट करण्याच्या नावाखाली 50 हजारांची मागणी सुरू केली. या घटनेनंतर तरुणाने कुटुंबीयासह मालवणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
तिघांना अटक, दोन फरार -
याप्रकरणी सध्या पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या उर्वरित दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे इरफान फुरकान खान (वय २६), अहमद फारुख शेख (वय २४) आणि इम्रान सफिक शेख (वय २०) अशी आहेत.
हेही वाचा -घृणास्पद : अल्पवयीन मुलीवर वडील आणि भावाकडून दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार