महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हरिभाऊ राठोड यांचा काँग्रेसला रामराम; उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार - आमदार हरिभाऊ राठोड

काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार हरिभाऊ राठोड यांनी पक्षाला अखेर सोडचिठ्ठी दिली आहे. आज मुंबईतील रंगशारदा येथील शिवसेनेच्या कार्यक्रमाला हरिभाऊ राठोड यांनी उपस्थिती दर्शवून काँग्रेस सोडल्याचे जाहीर केले.

हरिभाऊ राठोड यांचा काँग्रेसला रामराम

By

Published : Oct 5, 2019, 1:58 PM IST

मुंबई - काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार हरिभाऊ राठोड यांनी पक्षाला अखेर सोडचिठ्ठी दिली आहे. आज मुंबईतील रंगशारदा येथील शिवसेनेच्या कार्यक्रमाला हरिभाऊ राठोड यांनी उपस्थिती दर्शवून काँग्रेस सोडल्याचे जाहीर केले. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, काँग्रेसच्या काळात कोणतेही काम होत नव्हते. तसेच आपले प्रश्न सोडवले जात नव्हते, असे ते म्हणाले.

हरिभाऊ राठोड यांचा काँग्रेसला रामराम

भटक्या विमुक्त जमातींच्या प्रश्नांवर कधीही विचार केला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. याच कारणास्तव आपण काँग्रेस सोडत असल्याचे हरिभाऊ राठोड यांनी स्पष्ट केले.

हेही वाचाआदित्य मुख्यमंत्री झाले तर फडणवीसांना काहीही गैर वाटणार नाही - उध्दव ठाकरे

रंगशारदा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ओबीसी, भटके-विमुक्त, धनगर, कुणबी, बंजारा, तेली तसेच माळी, आगरी, समाजाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत हरिभाऊ राठोड यांनी उपस्थित राहून काँग्रेस सोडल्याचे जाहीर केले.

ABOUT THE AUTHOR

...view details