महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कष्ट करून सर्वांचे पोट भरतो, पण सरकारला दयामाया नाही! आदिवासी महिला शेतकऱ्यांची व्यथा - mumbai

मुंबईत धडकलेल्या शेतकरी महामोर्चात धुळ्यातील महिला शेतकऱ्यांनीही सहभाग नोंदविला आहे. तीन दिवसांपूर्वी या महिला आझाद मैदानात दाखल झाल्या आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावे तसेच शेतमालाला योग्य भाव द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या भूमिकेवर रोष व्यक्त करतानाच पुढच्या निवडणुकीत मोदी सरकारला हटवण्याचा निर्धार या महिलांनी केला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत माघार नाही अशी ठाम भूमिका या महिलांनी घेतली आहे.

कष्ट करून सर्वांचे पोट भरतो, पण सरकारला दयामाया नाही! आदिवासी महिला शेतकऱ्यांची व्यथा
कष्ट करून सर्वांचे पोट भरतो, पण सरकारला दयामाया नाही! आदिवासी महिला शेतकऱ्यांची व्यथा

By

Published : Jan 25, 2021, 11:25 AM IST

मुंबई : सकाळी 4 वाजता उठायचं, आवरायचं, स्वयंपाकपाणी करायचा आणि 8 ला घर सोडायचं. पायी-पायी 5 ते 6 किमी चालून जंगलात, शेतात जायचं. तिथं राब राब राबायचं. 4 वाजता घरी येऊन पुन्हा रांधा-वाढा करत रात्री थकायचं. एवढं करून आम्हाला काहीही मिळत नाही. आमच्या पिढ्या न पिढ्या गरीबीत जात आहेत. आम्हा महिला शेतकऱ्यांच्या तर समस्या अजून मोठ्या आहेत. आम्ही हाताने जमीन खोदतो, त्यात बी पेरतो, पीक पिकवून सगळ्याचं पोटं भरतो पण आमची दया माया या सरकारला येत नाही, किती दिवस आम्ही हे सोसायचं अशा शब्दात आपली व्यथा मांडली, ती आझाद मैदानावर जमलेल्या आदिवासी शेतकरी महिलांनी. धुळ्यावरून आलेल्या या महिला आपल्या व्यथा मांडताना खूपच भावूक होतात. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही आज येथे आलो असून मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही असे सांगताना त्या तितक्याच लढवय्या आणि खंबीर दिसतात. या महिला शेतकऱ्याशी संवाद साधला आहे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी मंगल हनवते यांनी.

ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी शेतकरी महिलांची व्यथा जाणून घेतली

ABOUT THE AUTHOR

...view details