पालघर -भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा ( Amrit Mahotsav of Indian Freedom ) अंतर्गत दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यामध्ये 4 लाख 80 हजार घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे उदिष्ठ जिल्हा प्रशासनाचे असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके ( Collector Govind Bodke ) यांनी सांगितले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री.बोडके बोलत होते.
तिरंगा ध्वज लावण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची - ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये प्रत्येक ग्रामस्थांच्या घरावर तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहे. महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या घरावर तिरंगा ध्वज लावण्याची जबाबदारी त्या त्या कार्यालय प्रमुखावर असणार आहे. तसेच तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी समन्वय ठेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व घरावर तिरंगा ध्वज लावण्यासाठी नियोजन करुन तिरंगा ध्वज लागला आहे, याची खात्री करावी असे निर्देशही जिल्हाधिकारी बोडके यांनी दिले.