महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'हम होंगे कामयाब'; संजय राऊतांचे रुग्णालयातून ट्विट - हम होंगे कामयाब

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेची आक्रमक भूमिका मांडण्याची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर होती. निवडणूका जाहीर होण्यापूर्वीपासून शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले होते.

लीलावती रुग्णालयात संजय राऊत हे लिखाण करत असतानाचा व्हिडिओ

By

Published : Nov 12, 2019, 10:20 AM IST

Updated : Nov 12, 2019, 3:21 PM IST

मुंबई- सत्तास्थापनेचा तिढा अजूनच गुंतागुंतीचा बनल्याचे चित्र दिसत आहे. या पेचात कायमच परखडपणे शिवसेनेची भुमिका मांडणारे संजय राऊत हम होंगे कामयाब असे ट्विट करत शिवसेनाच जिंकणार व मुख्यमंत्री आमचाच होणार असल्याचे संकेत दिले आहेत. संजय राऊत यांच्या छातील दुखत असल्याने त्यांना सोमवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांनी रुग्णालयातून ट्विट करत शिवसेनाच सत्तास्थापन करेल, असा विश्वास दर्शवला आहे.

हेही वाचा -राऊत यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीची पूर्ण कल्पना- दीपक सावंत

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेची आक्रमक भूमिका मांडण्याची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर होती. निवडणूका जाहीर होण्यापूर्वीपासून शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले होते.

लीलावती रुग्णालयात संजय राऊत हे लिखाण करत असतानाचा व्हिडिओ

हेही वाचा -मित्र पक्षांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ; जयंत पाटलांचे वक्तव्य

रोज सकाळी ट्विट आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत शिवसेनेची बाजू मांडत होते. मात्र, ऐन सत्तास्थापनेच्या काळात त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, तरीही संजय राऊत हे शांत न बसता रुग्णालयातून ट्विट करत आम्ही आशा सोडलेली नसून आम्हीच सत्तास्थापन करू, असा विश्वास त्यांनी शिवसैनिकांना दिला आहे.

संजय राऊत यांचा रुग्णालयातील एक फोटो सध्या प्रसिद्ध झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राऊत यांना उद्या (बुधवार) रुग्णालयातून डिस्जार्ज मिळण्याची शक्यता आहे. या फोटोमध्ये संजय राऊत काहीतरी लिखाण करत असल्याचे दिसत आहेत.

Last Updated : Nov 12, 2019, 3:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details