महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षेचे हॉलतिकिट मिळणार १८ फेब्रुवारीपासून - Mumbai News

इयत्ता दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे वेळेवर मिळावे यासाठी राज्य मंडळाकडून १८ फेब्रुवारीला दुपारी १ वाजेपासून शाळांना ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावर शाळांच्या लॉगिनमध्ये हॉलतिकिट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Hall tickets for the 10th exam will be available from February 18
परीक्षेचे हॉलतिकिट १८ फेब्रुवारीपासून

By

Published : Feb 16, 2022, 8:56 PM IST

मुंबई- दहावीची परीक्षा ( 10th Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे. १५ मार्च २०२२ पासून सुरू होणार्‍या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकिट १८ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

२१ हजार ३४९ केंद्र -

मार्च-एप्रिल २०२२ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचे (दहावी) वेळापत्रक जाहीर झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांना सहज परीक्षा देता यावी यासाठी राज्य मंडळाने ( Maharashtra State Board ) राज्यभरात ‘शाळा तेथे केंद्र’ या धर्तीवर तब्बल २१ हजार ३४९ केंद्र उपलब्ध केले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे वेळेवर मिळावे यासाठी राज्य मंडळाकडून १८ फेब्रुवारीला दुपारी १ वाजेपासून शाळांना ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावर शाळांच्या लॉगिनमध्ये हॉलतिकिट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळांना देण्यात आलेल्या लॉग-इन आयडी व पासवर्डच्या आधारे शाळा ही प्रवेशपत्रे डाउनलोड करू शकतील.

शाळांना सूचना -

  • प्रवेशपत्र प्रिटींगचे कोणतेही शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येऊ नये, प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असल्यास त्याची दुरुस्ती शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायाची आहे.
  • प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ यासंदर्भातील दुरुस्त्या शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे.
  • हॉलतिकिट विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास शाळांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यास द्यायाचे आहे.
  • फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.

अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details