मुंबई -मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरु माँ कांचन गिरी यांनी कृष्णकुंज येथे भेट घेतली. यावेळी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राज ठाकरे आणि यांच्यामध्ये अर्ध्या तासापेक्षा जास्त चर्चा झाली. राज यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रणही त्यांनी दिले आहेत. अयोध्येत येऊन हिंदूराष्ट्राच्या कार्यासाठी हातभार लावण्याची विनंतीही राज ठाकरेंना करण्यात आली आहे. राज ठाकरे हे डिसेंबरला अयोध्येला येणार असल्याचे कांचन गिरी यांनी सांगितले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्या अगोदर कांचन गिरी, जगतगुरू सूर्याचार्यजी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
राज ठाकरे यांच्याबरोबर हिंदुराष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी ही भेट झाली. तसेच परप्रांतीयाबद्दल देखील राज ठाकरे यांनी मराठी माणसाप्रमाणेच भावना ठेवावी तसेच परप्रांतीयांना सांभाळून घ्या. अयोध्येला एकदा आपल्या कार्यकर्त्यांसह भेट द्या व हिंदूराष्ट्र उभारणीसाठी आपले योगदान द्या, अशी चर्चाही या भेटी दरम्यान झाली असल्याचे कांचन गिरींनी सांगितले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वावरुन टीकास्त्र डागले आहे.
हिंदुत्वाचा विषय होऊ शकतो निवडणुकीचा मुद्दा?