मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ( ST employees silver oak attack ) एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवार 8 एप्रिल रोजी केलेल्या हल्ल्यात प्रकरणात 109 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. तसेच या प्रकरणात एसटी कामगार संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनादेखील अटक करण्यात आली होती. आज गिरगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. वकील सदावर्ते हे 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ( Advocate Sadavarte Police custody ) राहणार आहे.
अॅड. घरत ( Adv Gharat in Gunaratn Sadavarte ) म्हणाले, की पाच महिन्यांपासून एसटीच्या सरकारमध्ये विलिनिकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलकांकडून कोर्टात केस लढणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 530 रुपये प्रमाणे एकूण 1.80 कोटी रुपये गोळा केले आहेत.
हल्ल्याच्या घटनेनंतर सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्यांना दोन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्या कोठडीचा कालावधी आज संपल्याने त्यांना गिरगावच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीदरम्यान सरकारी वकील आणि सदावर्ते यांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. यावेळी सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून 1.80 कोटी रुपये जमविल्याचे सांगितले. पण, यावर उत्तर देताना सदावर्तेंचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी म्हटले की, पैसे घेतल्याप्रकरणी एकाही कर्मचाऱ्याने तक्रार दिलेली नाही. मग, या मुद्द्याचे प्रयोजन काय?