महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Gujarat CM visits in Mumbai - गुजरातचे मुख्यमंत्री मुंबई दौऱ्यावर, इब्रन्ट गुजरात कार्यक्रमाचे आयोजन - organizing Ebrant Gujarat program

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आज (दि. 2 डिसेंबर)रोजी मुंबई दौऱ्यावर आहेत. (Gujarat CM visits in Mumbai) येथे जानेवारी महिन्यात होणाऱ्या 10 वा 'व्हायब्रंट गुजरात' या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईमध्ये 'इब्रन्ट गुजरात' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी ते मुंबईतही व्यावसायिकांशी चर्चा करणार आहेत. भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिला मुंबई दौरा आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री मुंबई दौऱ्यावर
गुजरातचे मुख्यमंत्री मुंबई दौऱ्यावर

By

Published : Dec 2, 2021, 10:42 AM IST

मुंबई - गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आज (दि. 2 डिसेंबर)रोजी मुंबई दौऱ्यावर आहेत. येथे जानेवारी महिन्यात होणाऱ्या 10 वा 'व्हायब्रंट गुजरात' या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईमध्ये 'इब्रन्ट गुजरात' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी ते मुंबईतही व्यावसायिकांशी चर्चा करणार आहेत. भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिला मुंबई दौरा आहे. (Gujarat CM visits in Mumbai) गुजरातमध्ये दहावा ग्लोबल समिट जानेवारी महिन्यात होणार असून त्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे अर्थमंत्री कानू देसाई हे देखील उपास्थित असणार आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री मुंबई दौऱ्यावर, उद्योजकांच्या भेटी घेतल्या

उद्योजकांच्या भेटीगाठी

भुपैंद्र पटेल यांनी महाराष्ट्रातील उद्योजकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये व्हायब्रंट गुजरात या क्रार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील उद्योजकांना आमंत्रण देण्यात येत आहे. यामध्ये कोटक बॅंकचे संचालक उदय कोटक यांचीही भेट घेतली आहे. (Gujarat CM visits in Mumbai) यावेळी गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक करण्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, टाटा सन्सचे चेअरमन नटराज चंद्रशेखर यांचीही पटेल यांनी भेट घेतल्याचे समोर आले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री मुंबई दौऱ्यावर, उद्योजकांच्या भेटी घेतल्या

हेही वाचा -Mamata Pawar Meet : पवारांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जींकडून UPA शिवाय तिसऱ्या आघाडीचे सुतोवाच

ABOUT THE AUTHOR

...view details